Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनुष्का शर्माने मेकअप आर्टिस्टसाठी लिहिली भावूक पोस्ट

अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट 

अनुष्का शर्माने मेकअप आर्टिस्टसाठी लिहिली भावूक पोस्ट

मुंबई : अनुष्का शर्माचे मेकअप आर्टिस्ट सुभाष वंगल उर्फ सुब्बू यांच निधन झालं. अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर सुभाष यांचा फोटो शेअर करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. तिच्या पोस्टवरून लक्षात येतं की अनुष्का मेकअप आर्टिस्ट सुब्बू यांच्या किती जवळ होती. 

फोटोसोबत तिने एक पोस्टदेखील लिहीली आहे. यामध्ये तिने 'ते दयाळू होते', 'ते विनम्र होते' आणि ते भरपूर प्रतिभाशालीदेखील होते... सुब्बू देशातील अतिशय लोकप्रिय आणि ज्येष्ठ मेकअप आर्टिस्ट होते. त्यांनी माझ्या चेहऱ्याला हात लावला की, मी सुंदर बनायचे.... अशी भावना तिने आपल्या पोस्टमधून व्यक्त केली आहे. 

अनुष्का गेल्या काही महिन्यांपासून सिनेजगतापासून दूर आहे. 2018 मध्ये 'झिरो' या सिनेमातून शाहरूखसोबत आणि 'सुई धागा' सिनेमातून वरूण धवनसोबत दिसली होती. 2019 मध्ये तिचा एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. प्रेक्षकही तिला पाहण्यासाठी खूप आतूर आहेत.

Read More