Marathi News> मनोरंजन
Advertisement

ए आर रहमाननंतर त्याच्या टीममधील मोहिनीनेही दिला नवऱ्याला घटस्फोट, नेटकरी म्हणाले, 'काहीतरी शिजतंय'

एआर रहमानने पत्नी सायरा बानोपासून घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता त्याच्या संगीत टीमच्या सदस्य मोहिनी डे हिने देखील पतीपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. 

ए आर रहमाननंतर त्याच्या टीममधील मोहिनीनेही दिला नवऱ्याला घटस्फोट, नेटकरी म्हणाले, 'काहीतरी शिजतंय'

A. R. Rahman : प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान याने पत्नी सायरा बानोपासून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. एआर रहमान आणि सायरा यांचे 29 वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. अशातच आता संगीतकाराच्या टीममधील मोहिनी डेने देखील पोस्टमध्ये तिच्या पतीपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. मोहिनीची घोषणा एआर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो वेगळे झाल्यानंतर काही तासांनंतर आली आहे. मोहिनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे होत असल्याची माहिती दिली आहे. 

मोहिनी डे झाली पतीपासून विभक्त 

मोहिनी आणि मार्केने त्यांच्या संयुक्त पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही दोघे वेगळे झालो आहोत. सर्वप्रथम, आमचे मित्र आणि कुटुंबीयांशी बांधिलकी म्हणून आम्ही परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे. आम्ही चांगले मित्र आहोत. आपल्याला जीवनापासून वेगळ्या गोष्टी हव्या आहेत. त्यामुळे आम्ही परस्पर वेगळे होणे हा पुढे जाण्याचा उत्तम मार्ग होता. असं तिने म्हटलं आहे. 

एकत्र काम करत राहण्यावर भर 

आम्ही अजूनही MaMoGi आणि मोहिनी डे गटांसह अनेक प्रकल्पांवर एकत्र काम करणार आहोत. एकत्र चांगले काम केल्याबद्दल आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो आणि ते लवकरच थांबणार नाही.
जगातील प्रत्येकाला प्रेम मिळावे हीच इच्छा आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या सर्व मार्गांनी तुमच्या समर्थनाची आम्ही प्रशंसा करतो. कृपया यावेळी आमच्याबद्दल सकारात्मक राहून आणि आमच्या गोपनीयतेचा आदर करून आम्ही घेतलेल्या निर्णयाचा आदर करा. आम्ही कोणत्याही निर्णयांची प्रशंसा करणार नाही. असं तिने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एआर रहमान घटस्फोट 

एआर रहमानबद्दल बोलायचे म्हटले तर त्याने 1995 मध्ये सायरा बानोसोबत लग्न केले होते. त्यांना तीन मुले आहेत. ज्यांची नावे खतिजा, रहीमा आणि आमीन अशी आहेत. तिन्ही मुलांनी लग्न केलं आहे. परंतु, नात्यामध्ये तणाव वाढत गेल्याने एआर रहमान याने हा निर्णय घेतला आहे. त्याने ट्विट करत दोघे विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यावर चाहत्यांना देखील विश्वास बसत नाहीये. 

Read More