संगीतकार एआर रहमानने मंगळवारी रात्री एक धक्कादायक पोस्ट केली. रहमानने सायरा बानोसोबतचा 29 वर्षाचा संसार मोडला आहे. सोशल मीडिया X वर पोस्ट शेअर केल्यानंतर रहमानने या विषयावर मौन पाळलं होतं. पण संगीतकार रहमानने घटस्फोटानंतर पहिल्यांदा सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये संगीतकारने आनंद व्यक्त केला आहे. यामागे नेमकं कारण काय?
एआर रहमानने गुरुवारी मोठा आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या मल्याळम सिनेमा 'द गोट लाइफ' मध्ये आपल्या कामासाठी हॉलिवूड म्युझिक इन मीडिया अवॉर्डस 2024 मध्ये सर्वश्रेष्ठ स्कोर विदेशी भाषेकरिता पुरस्कार मिळाला आहे. याबाबतच रहमानने आनंद व्यक्त केला आहे.
Score – Independent Film (Foreign Language)
— A.R.Rahman (@arrahman) November 21, 2024
The Goat Life – A. R. Rahmanhttps://t.co/835qBtzD01
ए आर रहमानने मध्यरात्री एक्सवर हॉलिवूड म्युझिक इन मीडिया अवॉर्डसमध्ये विजेतांच्या यादीवर एक बिलबोर्ड लेख सादर केला. यामध्ये त्याने लिहिलं की, स्कोर इंडिपेंडेंट सिनेमा, द गोट लाइफ - एआर रहमान. पोस्ट पाहून चाहत्यांनी आणि सहकार्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी सांगितलं की, ऑस्कर 2025 चा मार्ग मोकळा.
गुरुवारी संध्याकाळी रहानने एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये त्याने टीम आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले. त्याने म्हटलं की, द गोट लाइफ या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ स्कोरचा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराकरिता मी हॉलिवूड म्युझिक ऍण्ड मीडिया अवॉर्ड्स यांचा खूप आभारी आहे..
संगीतकार रहमानने पत्नी सायरा बानोला घटस्फोट दिला आहे. 1995 साली लग्न आणि त्यानंतर तीन मुलं असा 29 वर्षांचा संसार रहमान आणि सायरा बानोने मोडला आहे. मंगळवारी एक पोस्ट शेअर करुन या दोघांनी वेगळे होण्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.