Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : ए आर रहमानला हिंदी भाषेचं एवढं वावडं का? सोशल मीडियावर ट्रोल

आपल्या गाण्यांमुळे रहमान जगभरात लोकप्रिय 

VIDEO : ए आर रहमानला हिंदी भाषेचं एवढं वावडं का? सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : जगभरात आपल्या संगीतामुळे ओळखला जाणार ए आर रहमान (A R Rahman) एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. रहमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका प्रोग्रामच्या एँकरची मस्करी करताना दिसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ए आर रहमान ट्रोल झाला आहे. 

हा प्रोग्राम रहमान यांच्या '99 Songs' च्या ऑडिओ लाँचचा कार्यक्रम होता. यामध्ये ए आर रहमान पहिल्यांदाच स्क्रीन रायटर आणि प्रोड्यूसरच्या रुपात काम केलं आहे. शुक्रवारच्या या कार्यक्रमात लीड अभिनेता एहान भट्ट आणि ए आर रहमान दोघं उपस्थित होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Surya (@suryasurya5073)

एँकरने रहमानचं स्वागत तमिळमध्ये करण्यात आलं आहे. पण एहानचं अँकरने हिंदीमध्ये स्वागत केलं. यावर रहमान एँकरची खिल्ली उडवली. हिंदी? असं म्हणतं ए आर रहमान स्टेजवरून उतरून गेला. तिने एँकरने म्हटलं की,'मी तुला पहिल्यांदाच विचारलं होतं की, तु तमिळमध्ये बोलणार ना?' मात्र अँकरने त्यावर सफाई देताना तमिळ मध्ये सांगितलं की,'मी फक्त एहानाला खुश करण्यासाठी हिंदीमध्ये बोलायला सुरूवात केली.'

यावर रहमान हसत म्हणाला की,'अरे मी तर फक्त मस्करी करत होतो.' यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये ए आर रहमान ट्रोल झाला आहे. रहमानचा हा अंदाज अतिशय मजेशीर होता. मात्र सोशल मीडियावर मात्र रहमानवर चाहते भरपूर नाराज झाले आहेत. अनेकांनी रहमानच्या या वर्तणुकीला हिंदी भाषेचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी असं देखील म्हटलंय की, रहमान सारख्या महान कलाकाराकडून अशी अपेक्षा नव्हती. रहमानला संगीतामुळे प्रत्येर भाषेतून प्रेम मिळालं आहे. त्याने असं वक्तव्य करणं योग्य नाही. 

Read More