Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटावर अरबाजचा खुलासा; सर्व काही ठीक चाललं होतं पण...

लग्नाच्या १८ वर्षांनंतर अरबाज आणि मलाइकाने घटस्फोटाचा निर्णय घेतला

घटस्फोटावर अरबाजचा खुलासा; सर्व काही ठीक चाललं होतं पण...

नवी दिल्ली : अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलाइक अरोरा ही बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारी जोडी होती. परंतु लग्नाच्या १८ वर्षांनंतर अरबाज आणि मलाइकाने घटस्फोटाचा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. आता या जोडीने घटस्फोट घेऊन २ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु आपल्या घटस्फोटावर अरबाजने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता अरबाजने त्यांच्या घटस्फोटाबाबत खुलासा केला आहे.

fallbacks

अरबाजने नुकताच एका टॉक शोमध्ये त्या दोघांच्या तुटलेल्या नात्याबाबत सांगितले. 'सर्व काही ठीक वाटत होतं पण तरीही आमचा घटस्फोट झाला. शोमध्ये तु इतरांना लग्नाचा सल्ला देणार का? या प्रश्नावर अरबाजने 'हा मी लग्नासाठी नक्कीच सल्ला देईन. लग्न आजच नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेली प्रथा आहे. जोपर्यंत काही ठीक होत नाही तोपर्यंत आपल्याकडून सर्व काही ठीक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे' असं त्याने म्हटलंय. 

OMG! सलमान खान बैठे हैं कुंवारे, अरबाज खान मलाइका से तलाक के बाद फिर करने जा रहे हैं शादी!

गेल्या वर्षी मलाइका अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेल्या आपल्या रिलेशनशिपबाबत चर्चेत होती. गेल्या काही दिवसांपासून तर मलाइका आणि अर्जुन लग्न करणार असल्याची चर्चा आहे. परंतु अर्जुन कपूरचे वडिल बोनी कपूर लग्नाविषयी चर्चेला अफवा असल्याचं सांगत आहेत. मलाइकाप्रमाणेच अरबाजही त्याच्या गर्लफ्रेंडसोबत असलेल्या रिलेशनशिपबाबत चर्चेत आहे. अरबाज लवकरच त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसह लग्न करण्याची चर्चा आहे.

Read More