Marathi News> मनोरंजन
Advertisement

वयाच्या 58व्या वर्षी पुन्हा बाबा होणार अरबाज खान, Mom-to-be शूराचा प्रेग्नेन्सी लूक चर्चेत

अभिनेता अरबाज खानने एका मुलाखतीत शूराच्या प्रेग्रेंसीच्या अफवा खऱ्या आहेत, हे स्पष्ट केले होते. त्यानंतर शूरा खान मुंबईतील एका शॉपिंग स्पॉटवर दिसली, जिथे तिच्या स्टाइलिश लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं. पाहूयात तिचा हा खास लूक. 

वयाच्या 58व्या वर्षी पुन्हा बाबा होणार अरबाज खान, Mom-to-be शूराचा प्रेग्नेन्सी लूक चर्चेत

Shura Khan: बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान याच्या आयुष्यात एक आनंदाची बातमी आहे. तो लवकरच पुन्हा एकदा बाबा होणार आहे. डिसेंबर 2023 अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत लग्न केले होते. अलीकडील एका मुलाखतीत त्याने शूरा गरोदर असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केले होते. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे.

मुलाखतीत बोलताना अरबाज म्हणाला होता की, 'होय, ती बातमी खरी आहे. माझ्या कुटुंबालाही याची कल्पना आहे आणि आम्ही या टप्प्याचा खूप आनंद घेत आहोत. ही आमच्या दोघांसाठी एक नवीन सुरुवात आहे.' त्याच्या बोलण्यातून तो बाळाच्या आगमनासाठी किती उत्सुक आहे हे स्पष्टपणे कळत होते. हे अरबाजची दुसरे लग्न असले तरी तो तितक्याच प्रेमाने आणि उत्साहाने या टप्प्याचा अनुभव घेतो आहे. 'माझ्यासाठी हे एक नवीन आणि खास पर्व आहे. ही भावना मला आतून समाधान देतेय. मी याचा उत्साहाने सामना करतो आहे,' असे तो पुढे म्हणाला.

याआधी अरबाजने अभिनेत्री मलायका अरोरासोबत लग्न केले होते. 20 वर्षांच्या सहजीवनानंतर 2019 मध्ये त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम मिळाला. त्यांना एक मुलगादेखील असून त्याचे नाव अरहान खान आहे. जो आता 22 वर्षांचा आहे आणि लवकरच तो सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. शूरा खान आणि अरबाज खान यांचे लग्न खूप साध्या पण खास पद्धतीने पार पडले होते. त्यांनी कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत 24 डिसेंबर 2023 रोजी लग्न केले. विवाहानंतर दोघांनी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करणारे फोटो शेअर करतात

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आता शूरा खान आई होणार आहे. अलीकडे ती मुंबईतील एका शॉपिंग स्पॉटवर दिसली, जिथे तिच्या स्टाइलिश लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं. ऑरेंज आणि पिंक रंगाच्या को-ऑर्ड सेटमध्ये दिसलेली शूराच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसत होता. तिने सैल फिटिंग शर्ट होता, ज्यावर बटण डिझाइन आणि समोर खिसे होते - अगदी सहज आणि कम्फर्टेबल लूक तिने केला होता जो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचे नैसर्गिक तेज स्पष्ट दिसत होते. चाहत्यांनी तिच्या या लूकवर प्रेमाचा वर्षाव केला असून अनेकांनी तिच्या आणि बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

शूरा ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असून तिने बॉलिवूडमध्ये मागील काही वर्षांत नाव कमावलं आहे. गरोदरपणातही तिचा आत्मविश्वास, सौंदर्य आणि स्टाईल पाहून अनेकांना प्रेरणा मिळते आहे.

Read More