Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लुक, वर्कआऊट नंतरच्या Video ने वाढवला सोशल मीडियाचा पारा

बॉलिवूडच्या अभिनेत्रीही अरबाज खानच्या गर्लफ्रेंड समोरी फिक्या, व्हायरल व्हिडीओची एकच चर्चा

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लुक, वर्कआऊट नंतरच्या Video ने वाढवला सोशल मीडियाचा पारा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर विविध व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता जॉर्जिया एंड्रियानीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकचं चर्चा रंगली आहे.  

बॉलिवूड अभिनेत्री कुठल्याही इवेंटला अथवा जीमला जाताना असो नेहमीच कॅमेरात कैद होत असतात. त्याप्रमाणेच आता जॉर्जिया एंड्रिया कॅमेरात कैद झाली आहे. वर्कआऊट करून परतताना तिला विरल भय्यानीने त्यांच्या कॅमेरात तिचा व्हिडिओ काढला आहे.

 व्हिडिओत काय? 
वर्कआउट हा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग आहे. फिटनेस राखण्यासाठी अभिनेत्री जीममध्ये खूप घाम गाळताना दिसतात. नुकतीच अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी वर्कआउट केल्यानंतर मुंबईत स्पॉट झाली आहे. यावेळी जॉर्जिया एंड्रियानी बोल्ड स्टाईलमध्ये दिसली. जॉर्जियाने स्पोर्ट्स ब्रा आणि लेगिंग्ज घालून तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट केली आहे. तसेच तिने व्हाइट स्नीकर्स आणि सनग्लासेससह तिचा वर्कआउट लूक पूर्ण केला. यासोबतच अभिनेत्री तिच्या हातात पाण्याची बाटली आणि मोबाईल फोन घेऊन जाताना दिसली.

वर्कआऊट लुकमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. तिच्या या बोल्ड लुकसमोर बॉलिवूड अभिनेत्या देखील फिक्या पडतील अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया आहेत. 

Read More