Marathi News> मनोरंजन
Advertisement

अविवाहित Salman Khan ला स्वतःचा पती म्हणणारी ही सुंदर महिला कोण?

चाहत्यांचा 'भाईजान' विवाहित आहे? 'ही' सुंदर महिला का म्हणतेय सलमान खानला स्वतःचा पती  

अविवाहित Salman Khan ला स्वतःचा पती म्हणणारी ही सुंदर महिला कोण?

मुंबई : अभिनेता सलमान खानला कोणत्याही ठिकाणी एकच प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न म्हणजे 'सलमान खान लग्न कधी करणार?' पण आजपर्यंत या कठीण प्रश्नाचं उत्तर कोणाला मिळालेलं नाही. पण आता ही सुंदर महिला सलमानला स्वतःचा पती म्हणत असल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सलमानला स्वतःचा पती म्हणणारी ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अर्चना गैतम आहे. 'बिग बॉस16' शोमध्ये एन्ट्री करताच अर्चनाने सर्वांना हैराण केलं आहे. 

काय म्हणाली अर्चना? 
बिग बॉसमध्ये जाण्याआधी अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली, बिग बॉसला खेळ म्हणून मी कधीच पाहिलं नाही. मी नेहमी म्हणत आलिये - मी आता बिग बॉसमध्ये जात आहे, मी जाऊबाईंसोबत बोलेल भांडेल (बिग बॉसचे स्पर्धक). सलमान माझे पती आहेत. बिग बॉस माझं सासर आहे. या शोचे स्पर्धक माझे दीर आणि वहिन्या आहेत...' 
 
महत्त्वाचं म्हणजे अर्चनाच्या या वक्तव्यावर सलमानची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'बिग बॉस 16' ला आता सुरुवात झाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शेतकऱ्याची मुलगी अर्चना... 
बिग बॉसमध्ये अभिनेत्रीच्या प्रवेशाने कुटुंब खूप आनंदी असून, ती स्वतःला शेतकऱ्याची मुलगी असल्याचं अर्चनाने सांगिते. एवढंच नाही तर अभिनेत्रीला उत्तम स्वयंपाक देखील येतो. त्यामुळे अभिनेत्रीचा बिग बॉसमधील प्रवास कसा असेल हे येणारा काळच ठरवेल. 

Read More