Marathi News> मनोरंजन
Advertisement

Navjot singh sidhu resignation: राजीनामा सिद्धू यांचा आणि कौतुक मात्र अर्चना पूरन सिंह यांच...

सिद्धू यांनी दिला राजीनामा, सोशल मीडियावर अर्चना पूरन सिंह ट्रेंडमध्ये 

Navjot singh sidhu resignation: राजीनामा सिद्धू यांचा आणि कौतुक मात्र अर्चना पूरन सिंह यांच...

मुंबई : मंगळवारी पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी राजीनामा देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, ते काँग्रेसशीच जोडलेले असणार. एका बाजूला नवजोत सिंह सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर दुसऱ्या बाजूला प्रेक्षक अर्चना पूरन सिंह यांचं कौतुक करत आहे. त्यांना पुष्पगुच्छ देत आहेत. 

सिद्धू यांनी दिला राजीनामा, सोशल मीडियावर अर्चना पूरन सिंह ट्रेंडमध्ये 

ट्विटरवर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. कारण एकदा नवज्योतसिंग सिद्धू द कपिल शर्मा मध्ये गेस्ट जज होते. पाकिस्तानवरील त्यांच्या वक्तव्यानंतर गोंधळ झाला आणि त्यांना कपिल शर्मा शो सोडावा लागला. यानंतर त्यांना अभिनेत्री अर्चना पूरन सिंहने रिप्लेस केलं आहे.

सोशल मीडियावर नवजोत सिंह सिद्धू यांच्यावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. यासोबतच अर्चना देखील ट्रेंडमध्ये आहेत. अनेकजण म्हणतात, अर्चनाजी तुमची खुर्ची आता धोक्यात आहे. सिद्धू कधीही वापसी करू शकतात. 

नवजोत सिंह सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर अर्चना सिंह या ट्रेंड होत आहेत. युझर्स त्यांच्याबद्दल फनी मीम्स व्हायरल करत आहेत. अर्चना सिंह यांच कौतुकही होतय आणि ट्रेंडही होत आहेत. लोकं असही म्हणतात की, अर्चना पुरन सिंह आता राहुल गांधी यांच्यापेक्षाही टेंशनमध्ये असतील.

Read More