मुंबई: बादशाह आणि अरिजीत सिंह दोन्ही गायकांच्या आवाजाचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. बॉलिवू़डमधील टॉपचे असलेले या दोन्ही गायकांची गाणी कायम हिट असतात. बादशाहच्या रॅपला जितकी पसंती मिळते तेवढीच अरिजीतची गाणी ओठांवर रेंगाळत असतात. सध्या या दोन्ही गायकांचा कॉन्सर्ट मधील एक व्हिडीओ सोशलमीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बादशाह अरिजीत सिंहच्या पाया पडताना दिसून येत आहे.
बँकॉकमध्ये बादशाह आणि अरिजीत यांची लाईव्ह कॉन्सर्ट होती. खरंतर या दोघांनाही एकत्र गाताना ऐकणं हे त्यांच्या फॅन्ससाठी मोठी पर्वणी असते. अरिजीतच्या आवाजाने भारावून गेला. स्टेजच्या मागच्या बाजूने पुढे येत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये कशाचीही पर्वा न करता बादशाह अरिजीतच्या पाया पडला. अरिजीतच गाण्यावरचं प्रेम आणि संगीतावरची निष्ठा त्याच्या आवाजातून दिसून येते, असं बादशाहने सर्वांसमोर त्याचं कौतुक केलं.
सगळ्यांच्या समोर वयाने लहान असणाऱ्या अरिजीत पाया पडला म्हणून बादशाहाच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.
What a Moment!!
— ᴄʜɪᴛᴛᴀʀᴀɴᴊᴀɴ ♪ (@i_CHITTARANJAN1) April 6, 2024
Badshah touched Arijit Singh's feet..
Soulmate live at Bangkok, Thailand pic.twitter.com/q0jpLhP55w
बादशाहने काही दिवसांपूर्वी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अरिजीतचा व्हिडीओ पोस्ट केला होता.'हमेशा बाथरुम सिंगर बना रहूंगा' असं त्याने कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला होता. पुढे तो असंही म्हणतो की, अरिजीत सोबत गायचं असतं तेव्हा मला दोन दिवस आधी टेंशनमुळे झोप लागत नाही. अरिजीत त्याच्या आवाजाने कायमच सर्वांची मनं जिंकतो तर बादशाहच्या गाण्यांशिवाय कोणत्याच पार्टीची मजा घेता येत नाही. दोघं ही बॉलिवूडमधले बेस्ट गायक आहेत,अशी कमेंट त्यांच्या फॅन्सनी केल्या आहेत. बादशाह आणि अरिजीत सिंह दोघंही बॉलिवूडमधील टॉपचे गायक असून त्यांचा फॅन फॉलोविंग फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात आहेत.
2005मध्ये अरिजीतने करियरची सुरुवात एका रियलिटी शो मधून केली होती. 2011मध्ये रिलीज झालेल्या मर्डर 2 सिनेमातील "फिर मोहब्बत" या गाण्याने त्याला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर आशिकी 2, कपूर अॅन्ड सन्स सुपरहिट यांसारख्या अनेक हिंदी फिल्मस् आणि अल्बममध्ये अरिजीतने गाणी गायिली. याशिवाय एका रीयालिटी शोमध्ये त्याने मी डोलकर दर्याचा राजा हे कोळीगीत गायलं असून त्याने गायलेल्या गाण्याला चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. त्याचबरोबर मूळचा पंजाबचा असलेल्या बादशाहने त्याच्या करीयरची सुरुवात 2006 मध्ये केली होती. बादशाहने बॉलिवूड व्यतिरिक्त पंजाबी आणि हरीयाणा भाषेतील अल्बम आणि फिल्ममध्ये गाणी गायली. काला चश्मा, डीजे वाले बाबू या त्याच्या गाण्यांनी बॉलिवूडला वेड लावलं.