Marathi News> मनोरंजन
Advertisement

जान्हवीच्या ड्रेसवर अभद्र कमेंट करणाऱ्या वेबसाईटवर भडकला अर्जुन

 श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूर आपल्या बहिणींची काळजी घेताना दिसतोय.

 जान्हवीच्या ड्रेसवर अभद्र कमेंट करणाऱ्या वेबसाईटवर भडकला अर्जुन

मुंबई : श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूर आपल्या बहिणींची काळजी घेताना दिसतोय. कारण जान्हवी कपूरबद्दल अभद्र कमेंट करणाऱ्या वेबसाईटचा अर्जुनने चांगलाच समाचार घेतलाय. जान्हवी कपूर ही वडील बोनी आणि बहिण खुशी सोबत काल अर्जून कपूरला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात त्यांचे फोटो कैद झाले. हे फोटो मोठ्या प्रमाणात वायरल झाले. एका वेबसाईटने हे फोटो चुकीच्या पद्धतीने समोर आणले. तशी बातमी आल्यानंतर अर्जुन भडकला.

fallbacks

त्याने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करत वेबसाईटला चांगलेच खडे बोल सुनावले.

आपला परीवारातील मुलींबद्दल छापल्या जाणाऱ्या बातम्यांप्रती तो सजग आहे. यातून त्यांना वाचविण्यासाठी तो कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. 

Read More