Marathi News> मनोरंजन
Advertisement

Malaika Arora ला Miss करतोय Arjun Kapoor, खास फोटो शेअर करत म्हणाला...

Arjun Kapoor ला सतावतेय Malaika Arora ची आठवण... दोघांच्या त्या खास फोटोवर ती म्हणते...   

Malaika Arora ला Miss करतोय Arjun Kapoor, खास फोटो शेअर करत म्हणाला...

 मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलपैकी एक म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेता मलायका अरोरा. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता दोघांनी त्यांच्या नात्याला अधीक महत्त्व दिलं. अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन आणि मलायका यांच्यातील जवळीक वाढली. दोघांनी त्यांचं नातं सर्वांसमोर मान्य देखील केलं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका आणि अर्जुनला लग्न कधी करणार असा प्रश्न सतत विचारण्यात येत आहे. 

लग्न कधी करणार असा प्रश्न विचारल्यानंतर अर्जुनने,  'माझं लक्ष सध्या पूर्णपणे करियरकडे आहे. मला प्रोफेशनली स्थिर व्हायचं आहे. मला असं काम करायचं आहे, ज्यामुळे मला आनंद मिळेल. कारण जोपर्यंत मी आनंदी राहू शकत नाही, तोपर्यंत मी माझ्या पार्टनला आनंदी ठेऊ शकत नाही.' असं उत्तर दिला. 

दरम्यान, मलायका आणि अर्जुनचा लग्नाचा विचार नसला तरी, दोघे चांगल्या वाईट प्रसंगी कायम एकमेकांची साथ देतात. आता अर्जुनने मलायकासोबत एक फोटो शेअर केला आहे. 

फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये 'कोण अधिक चांगलं दिसत आहे, हे जाणून घेण्यासाठी स्वाइप करा... #throwbackmemories #paris.’' असं लिहिलं. अभिनेत्याच्या फोटोवर खुद्द मलायकाने केलेली कमेंट चर्चेत आहे. 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांनी 2019 मध्ये इन्स्टाग्रामवरून याची जाहीर घोषणाही केली होती. 

Read More