Marathi News> मनोरंजन
Advertisement

Malaika Arora होणार आई? अर्जून कपूरचं मोठं वक्तव्य

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अर्जून कपूरने मलायका अरोराच्या प्रेग्नंसीच्या बातमीचा एक फोटो शेअर करत...

Malaika Arora होणार आई? अर्जून कपूरचं मोठं वक्तव्य

मुंबई : अर्जून कपूर आणि मलायका ही जोडी बॉलिवूडची प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. नेहमी हे कपल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. या कपलबाबत नुकतीच एक बातमी समोर आली आहे. लवकरच मलायका आणि अर्जून आपल्या पहिल्या मुलाचं स्वागत करण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं जात आहे. लवकरच मलायका आई होणार असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. समोर आलेल्या या बातमीत खरच तथ्य आहे का? याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

सोशल मीडियावर स्पष्टच बोलला अर्जून कपूर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अर्जून कपूरने मलायका अरोराच्या प्रेग्नंसीच्या बातमीचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये खूप काही लिहीलं आहे. अभिनेत्याने रिपोर्टर आणि त्या वेबसाईडला टॅग करत लिहीलं की, अशा निष्काळजीपणाने अशा बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. हे खूप असंवेदनशील आणि अनएथिकल  आहे.  

खरंतर सध्या सगळीकडे मलायका अरोराच्या प्रेग्नंसीचा दावा केला जात आहे. नुकतंच मलायका अरोरा आणि अर्जून कपूर ऑक्टोबरमध्ये लंडनला गेले होते. जिथे या दोघांनी आपल्या जवळच्या लोकांना प्रेग्नंसीबद्दल सांगितलं होतं असं या बातमीत म्हटलं जात होतं. अभिनेत्याने या बातमीवर राग काढत सांगितलं की, तो नेहमी यासारख्या फेक गॉसिप आर्टिकल्स (Fake Gossip Articles)ला ईग्नोर करतो. ज्यामुळे जर्नालिस्ट अशा बातम्या छापतात. जे योग्य नाहीये.

fallbacks


 
व्हायरल होतेय एक्टरची रिएक्शन
अर्जून कपूरने कॅप्शनच्या शेवटीलिहिले की, तू आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याची हिम्मत करू नकोस. अभिनेत्याची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दुसरीकडे, अभिनेत्याने ज्या वेबसाइटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. मात्र या वेबसाईटने मलायकाच्या गरोदरपणाची बातमी अनपब्लिश केली आहे.

Read More