Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेता अर्जुन कपूरही दुबईला रवाना

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गूढ आता वाढत चाललं आहे. मृत्यूबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

अभिनेता अर्जुन कपूरही दुबईला रवाना

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गूढ आता वाढत चाललं आहे. मृत्यूबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

अर्जुन कपूर दुबईला रवाना

बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आणि अभिनेता अर्जुन कपूर देखील आता दुबईला रवाना झाला आहे. पण दुबईला जाण्यामागचं कारण अजून अस्पष्ट आहे. काही औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अर्जुन कपूर दुबईला जात असल्याचं यश राज फिल्मच्या पीआरओंनी सांगितलं आहे. अर्जुन कपूर आणि श्रीदेवी यांच्यामध्ये संबंध इतके चांगले नव्हते. त्यामुळे अर्जुन दुबईला गेला की त्याला बोलवण्यात आलं याबाबत आता संभ्रम कायम आहे. 

दुबई पोलीस श्रीदेवींच्या मृत्यू प्रकरणात कसून चौकशी करत आहे. श्रीदेवींचे फोन डिटेल, सीसीटीव्ही फुटेज, आधीचे मेडिकल रिपोर्ट याबाबत तपास केला जात आहे.

दुबई सोडण्यास मनाई

याआधी श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात बोनी कपूर यांची चौकशी झाली. बोनी कपूर यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर बोनी कपूर यांना दुबई सोडण्य़ास मनाई करण्यात आली आहे.

बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने सगळ्यांच चांगला धक्का बसला आहे. पण आता त्यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं आहे. या संपूर्ण घटनेत असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. ज्यामुळे श्रीदेवींचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Read More