Arjun Kapoor Net Worth: अर्जुन कपूर 16 जून रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. 2012 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अर्जुनने आजपर्यंत फारसे हिट चित्रपट दिलेले नाहीत. उलट त्याचे बहुतांश चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. तरीही त्याची संपत्ती इतकी मोठी आहे की अनेकांना आश्चर्य वाटेल.
चित्रपट निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूरने 'इश्कजादे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि अर्जुनच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. या चित्रपटासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. मात्र, या यशानंतर अर्जुनचा प्रवास फारसा चांगला दिसला नाही. 2016 मध्ये 'की अँड का' हा त्याचा शेवटचा सेमी-हिट ठरलेला चित्रपट होता. त्यानंतर मात्र त्याचा एकही चित्रपट हिट झाला नाही.
सलग 10 चित्रपट फ्लॉप
2017 मध्ये आलेला 'हाफ गर्लफ्रेंड' हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही. 'मुबारकां' देखील फक्त सरासरी ठरला. 2019 मध्ये आलेले 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' आणि 'पानीपत' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडले. 2021 मधील 'संदीप और पिंकी फरार' सुद्धा फारसा चालला नाही. 2022 मध्ये आलेला 'एक व्हिलन रिटर्न्स' हा देखील प्रेक्षकांना खास भावला नाही. त्यानंतर 2023 मधील 'कुत्ते' आणि 'द लेडी किलर' हे चित्रपट देखील अपयशी ठरले. 2025 मध्ये आलेला 'मेरे हसबंड की बीवी' देखील फ्लॉप ठरला.
काही हिट चित्रपट, पण खूप कमी
अर्जुन कपूरच्या काही मोजक्या चित्रपटांनीच यश मिळवले. 'इश्कजादे' हा त्याचा डेब्यू चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर '2 स्टेट्स' हिट झाला, तर 'गुंडे' आणि 'की अँड का' हे चित्रपट सेमी-हिट होते.
संपत्ती ऐकून बसेल धक्का
इतके अपयश असूनही अर्जुन कपूर एक आलिशान जीवन जगतो. 2023 मध्ये त्याची एकूण संपत्ती जवळपास 85 कोटी इतकी होती. तो एका चित्रपटासाठी 5 ते 10 कोटी मानधन घेतो. याशिवाय तो ब्रँड एंडोर्समेंट्समधून देखील भरपूर कमाई करतो. एका ब्रँडसाठी 1 कोटी मानधन घेतो.
वैयक्तिक आयुष्यातमुळे चर्चेत
अर्जुन कपूर त्याचा वैयक्तिक आयुष्यामुळे बराच काळ चर्चेत आलेला. अर्जुन कपूरने अभिनेत्री मलायका अरोरासोबत जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. त्यांच्या नात्यात वयाचंही लक्षणीय अंतर होतं - मलायका 51 वर्षांची आहे, तर अर्जुन 40 वर्षांचा आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे हे दोघं आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.