Marathi News> मनोरंजन
Advertisement

Taimur Unseen Photo : अर्जुन कपूरमुळे तैमूरचा हटके लूक समोर

तैमूरच्या फोटोची पुन्हा एकदा चर्चा 

Taimur Unseen Photo : अर्जुन कपूरमुळे तैमूरचा हटके लूक समोर

मुंबई : 21 सप्टेंबर रोजी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) चा वाढदिवस झाला. चाहत्यांसोबतच तिच्या जवळच्यांनी दिले वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अर्जुन कपूरने करीना मात्र थोडं उशिरा शुभेच्छा दिल्या. 23 सप्टेंबर रोजी अर्जून कपूरने करीनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी एक फोटो पोस्ट केला. यामध्ये तैमूरचा हटके लूक समोर आला. 

भूत पोलिस सिनेमाच्या सेटवरचा फोटो 

अर्जुन कपूरने भूत पोलिस या चित्रपटाच्या शूटिंग सेटचा एक फोटो शेअर केला आहे. अर्जुनसोबत सैफ अली खान, करीना कपूर खान आणि तैमूर अली खान चित्रात दिसत आहेत. चित्रात सैफ-अर्जुन त्याच्या फिल्मी पात्रामध्ये दिसत असताना तैमूर खुर्चीवर बसलेला आहे, तर अर्जुनच्या मागे करीनाने मास्क घातला आहे आणि शाल गुंडाळली आहे.

अर्जूनने शेअर केली पोस्ट 

ही पोस्ट शेअर करताना अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबो, मला हा फोटो शेअर करण्यासाठी फक्त एक निमित्त हवे होते जेथे मी, टिम (तैमूर) आणि नवाब साहब उपस्थित होतो, पण जसे आपण सर्वजण जाणतो की आपण नेहमीच आकर्षणाचे केंद्र आहात जेव्हा आपण फोकसच्या बाहेर असाल तरीही प्रत्येक फ्रेमचा.

fallbacks

करीनाची या फोटोवर प्रतिक्रिया 

करीना कपूर खाननेही अर्जुनच्या या पोस्टला आणि त्याच्या कॅप्शनला प्रतिसाद दिला आहे. अर्जुनच्या या पोस्टवर टिप्पणी करताना करीनाने लिहिले, 'ओउई ... हे कॅप्शन अगदी खरे आहे, मी तुम्हा मुलांची चमक नेहमी चोरत असेन. भरपूर प्रेम.' चाहत्यांना अर्जुनची पोस्टच नाही तर करीनाचे रिप्लाय खूप आवडत आहे आणि कमेंट करून दोघांवरही प्रेम व्यक्त करत आहेत.

Read More