Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलाइका आरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच अडकणार लग्न बंधनात

गेल्या काही दिवसांपासून मलाइका आणि अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा वाऱ्या सारख्या पसरत आहेत.

मलाइका आरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच अडकणार लग्न बंधनात

मुंबई:मलाइका आरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या प्रेमाचे किस्से चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांनी त्यांचा नात्याचा खुलासा केलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून मलाइका आणि अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा वाऱ्या सारख्या पसरत आहेत.दिग्दर्शक करण जोहरने दोघे विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले. मलाइका अर्जुन दोघांसाठी घर शोधत आहेत. याच आधारावर दोघे लग्न करणार असल्याचे समजत आहे. घराच्या शोधात दोघे काही बिल्डर्सला भेटले आहेत.त्यांनी लोखंडवाला कॉम्प्लेक्स जवळ घर खरेदी केले. लग्नानंतर अर्जुन- मलाइका त्याच घरात रहणार.

नुकताच करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करणमध्ये राहुल पंड्या आणि के.एल राहुल आले होते. त्याचवेळी मलाइकावर माझे क्रश होते पण आता नाही असे वक्तव्य राहुलने केले होते त्यावर करणने, अर्जुन कपूर मलाइकाला डेट करत आहे म्हणून का? असे विचारले.


अर्जुन कपूरने सुद्धा आपल्या नात्याला हिरवा कंदील दाखवला आहे.अर्जुनला, तुम्ही सिंगल आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा त्याने आपण सिंगल नसल्याचे सांगितले. 

Read More