Shalini Pandey : डब्बा कार्टेल या वेब सीरिजची सगळीकडे चर्चा सुरु आहे. या सीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री शालिनी पांडे तिच्या या सीरिजमधल्या भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शालिनी पांडेनं एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की एकदा जेव्हा ती कपडे बदलत होती तेव्हा एक दाक्षिणात्य दिग्दर्शक तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये घुसला होता. त्यानं व्हॅनिटीमध्ये येण्या आधी दरवाजावर ठोठावलं देखील नाही आणि थेट आत आला. हा संपूर्ण प्रकार शालिनीनं मुलाखतीत सांगितला आहे.
शालिनीनं फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की दिग्दर्शकानं दरवाजा ठोठावला नाही आणि फक्त थेट व्हॅनिटीमध्ये आला. त्यानंतर शालिनीनं सांगितलं की 'तिच्या तिच्या करिअरच्या सुरुवातीला स्वत: ला या सगळ्यापासून लांब ठेवण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी काही नियम ठेवले होते. चित्रपटसृष्टीत पुरुषांसोबत काम करण्याचा अनुभव सांगत शालिनी म्हणाली, असं नाही की मी माझ्या करिअरमध्ये फक्त चांगल्या माणसांसोबत काम केलं. मी माझ्या आयुष्यात वाईट वृत्तीच्या लोकांसोबत देखील काम केलं आहे. मी ऑनस्क्री, ऑफस्क्रीन आणि क्रूमधल्या लोकांविषयी बोलतेय. तुम्हाला फक्त एक लिमिट ठरवायची असते. मी सगळ्यात जास्त वाईट लोकांचा देखील सामना केला आहे, हे देखील तितकंच सत्य आहे.'
शालिनीनं पुढे सांगितलं की 'मी कोणत्याही फिल्मी कुटुंबातून आलेली नाही. सुरुवातीला मला काहीच माहित नव्हतं. मी पूर्णपणे आऊटसाईडर होते. मी माझ्या कुटुंबाला सोडलं आणि माझ्याकडे त्यांच्याकडे परत जाण्यासाठी काहीच राहिलं नव्हतं. अशा परिस्थितीत कोणती गोष्टी कशी असायला हवी असं विचारायला देखील कोणी नव्हत, हे विचारण्यासाठी माझ्याकडे कोणीच नव्हतं. आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला आनंद होतो की मी अशीच होते. मी भोळी होते, पण मी माझ्या मर्यादांना घेऊन पक्की होते.'
आता तिच्यासोबत झालेल्या विचित्र घटनेविषयी बोलताना शालिनी पुढे म्हणाला, 'आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी एक दाक्षिणात्य चित्रपट केला होता. दिग्दर्शक माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आला. त्यानं दरवाजा ठोठावला नाही आणि मी कपडे बदलत होते. त्यानं थेट दरवाजा उघडला. ही एक मुलगी आहे जिनं नुकताच तिचा पहिला चित्रपट केला आहे. लोकं सर्वसामान्यपणे खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांना वाईट वाटू नये यासाठी हे सगळं करतीात. ते म्हणतात, नाही तर तुम्हाला चित्रपट मिळणार नाही.'
शालिनीनं सांगितलं की ती त्या दिग्दर्शकावर ओरडली. ती म्हणाली, 'तो जसा आत आला, मी काही विचार देखील करू शकत नव्हते. ती फक्त माझी प्रतिक्रिया होती आणि मी चिडले. मी पूर्णपणे पागल झाले. मी 22 वर्षांचे होते. जेव्हा तो तिथून निघून गेला, तेव्हा लोकांनी मला सांगितलं की मी ओरडायला नको होतं. पण काय करायचं याची जाणीव असायला हवी. फक्त मी नवीन आहे म्हणून न ठोठावता तू आत येऊ शकत नाही. तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाही आणि मला या गोष्टीची जाणीव झाली की हे असं काही आहे जे मी कायम माझ्यासोबत ठेवलं. मी लोकांना एक रागीट व्यक्ती वाटते. पण मला स्वत: ला वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात.'
हेही वाचा : Sikandar ला सपोर्ट मिळत नसल्याने सलमान खान भावूक, म्हणाला- 'मलाही सपोर्टची गरज आहे पण...'
पुढे या सगळ्यांना कसं सांभाळायचं याविषयी सांगताना शालिनी म्हणाली, 'त्यानंतर मला जाणीव झाली की लोकांनावर चिडण्यापेक्षा या गोष्टींना कसं सांभाळायचं. शालिनीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर डब्बा कार्टलआधी ती आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत महाराजा चित्रपटात दिसली होती. सध्या ती धनुष दिग्दर्शित तिचा आगामी चित्रपट 'इडली कढाई'च्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे.'