Bigg Boss OTT 3: 'बिग बॉस ओटीटी सीझन 3' मध्ये फुल ऑन ड्रामा पाहायला मिळत आहे. जसा हा शो सुरु झाला आहे. तेव्हा पासून तो अधिक मनोरंजक होत चालला आहे. नीरज, पायल मलिक, पौलामी दास आणि मुनिषा खटवानी यांना शोमधून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यानंतर या वीकेंडमध्ये चंद्रिका दीक्षितला घराबाहेर काढणार असल्याची माहिती समोर येत आहे. या शोमध्ये अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वंच प्रेक्षकांचं एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ती म्हणजे अरमान मलिकने त्याची पत्नी कृतिका मलिकसोबत लग्न करताना घट्ट कपडे घालण्यास मनाई केली होती.
अरमान-कृतिकामध्ये काय घडलं?
Bigg Boss OTT 3 मध्ये कृतिका मलिक अनेकदा जिम वेअरमध्ये आणि व्यायाम करता दिसत आहे. लेटेस्ट एपिसोडमध्ये कृतिका मलिक गुलाबी आणि काळ्या रंगाचे जिम वेअर परिधान करताना दिसली. जेव्हा ती अरमान मलिकजवळून गेली तेव्हा त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला बोलावले आणि कृतिकाला कपडे बदलण्यास सांगितले. यावर कृतिकाने विचारले, 'मी पायजमा घालू का?' त्यावर अरमानने उत्तर दिले, ठीक आहे, त्यावर शेप दिसत आहे असं त्याने म्हटलं. हे ऐकून कृतिका तिथून निघून गेली. नंतर, तिने स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना तिच्या वरती काळ्या रंगाचे जाकीट घातलेले दिसले.
Nomination par confusion? Kaun kisko karega save aur kaun hoga nominate?
— JioCinema (@JioCinema) July 12, 2024
Jaanne ke liye dekhiye #BiggBossOTT3 24 hrs Live Channel on JioCinema Premium.@loveutuber #ArmaanMalik #KritikaMalik #BBOTT3onJioCinema #BBOTT3#BiggBoss #JioCinemaPremium pic.twitter.com/cSXTEI1orS
काय आहे कारण?
काही दिवसांपूर्वी विशाल पांडेने शोमध्ये सांगितले होते की, त्याला कृतिका भाभी आवडते. जी संपूर्ण घरात एक मुद्दा बनली होती. त्यावेळी अरमानने विशालला थप्पड देखील मारली होती. त्यानंतर कृतिका मलिक एका एपिसोडमध्ये चंद्रिका दीक्षितसोबत विशाल पांडेने केलेल्या कमेंटबद्दल बोलताना दिसली होती. त्यावेळी कृतिकाने सांगितले की, ती डीप नेक डिझाइन असलेले कपडे घालू शकत नाही. कारण तिला अस्वस्थ वाटत आहे. त्यानंतर विशाल पांडेच्या चाहत्यांनीही अरमान आणि कृतिकाला सोशल मीडियावर ट्रोल केलं.
Bigg Boss OTT 3 मध्ये उरले 11 स्पर्धक
अलीकडेच वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षितला बिग बॉस OTT 3 मधून बाहेर काढण्यात आलं आहे. चंद्रिकापूर्वी टॅरो कार्ड वाचक मुनिषा खटवानी, पौलोमी दास, पायल मलिक आणि नीरज गोयत यांचा प्रवास संपला आहे. अशा परिस्थितीत आता घराघरात सना मकबूल, सई केतन राव, अरमान मलिक, कृतिका मलिक, शिवानी कुमारी, सना सुलताना, दीपक चौरसिया, विशाल पांडे, लव कटारिया आणि रॅपर नेझी यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरु आहे.