Marathi News> मनोरंजन
Advertisement

It's A Boy, म्हणतं अभिनेत्याने शेअर केली Good News

घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन 

It's A Boy, म्हणतं अभिनेत्याने शेअर केली Good News

मुंबई : मराठी कलाविश्वात सध्या काही ना काही घडत आहे. कुणी लग्नबंधनात अडकतंय तर कुणी गोड बातमी शेअर करत आहे. असाच आनंद एका मराठमोळ्या अभिनेत्याने आपल्यासोबत शेअर केला आहे. अभिनेता आरोह वेलणकर 'बाबा' झाला आहे. (Aroh Welankar become Father Now) मंगळवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी त्याने शेअर केली आहे. 

It's A Boy असं लिहिलेला एक सुंदर फोटो आरोहने शेअर केलाय. Yaasss असं अगदी मोजकं कॅप्शन लिहिलं आहे. आरोह वेलणकरने या अगोदर आपल्या पत्नी अंकिताचे डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले होते. या फोटोतून 'आता फक्त दोनच महिने उरले' अशी कॅप्शन देत फोटो शेअर केले होते. ('भाडीपा'च्या दिग्दर्शक, अभिनेत्याला 'कन्यारत्न') 

 

आरोह वेलणकरला चाहत्यांसोबत कलाकारांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये स्पृहा जोशी, सुयश टिळक, गौरी नलावडे अशा बऱ्याचं मराठी कलाकारांचा समावेश आहे. आरोहसोबतच अभिनेता निपुण धर्माधिकारी देखील काही दिवसांपूर्वी बाबा झाला आहे. त्याने आपल्या गोंडस मुलीचा फोटो शेअर केलाय. तसेच अभिनेत्री धनश्री कडगावकरने देखील मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर ती कायमच बाळाचे फोटो शेअर करत असते. (वहिनीसाहेबांचे त्यांच्या चिमुकल्यासह फोटो पाहिलेत का?) 

आरोह वेलणकर सध्या ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत सौरभची भूमिका साकारत आहे. या मालिकेत मिताली मयेकर त्याची सहकलाकार आहे. आरोहने ‘रेगे’ या सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आहे. 'रेगे' या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला आरोहची दखल घ्यायला भाग पाडलं. 

Read More