Marathi News> मनोरंजन
Advertisement

अर्शद वारसीच्या 'या' 150 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यामध्ये तुम्हालाही राहायचंय? एका रात्रीचं भाडं किती?

Arshad Warsi : अर्शद वारसीनं नुकताच त्याचा घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या बंगल्यात एक रात्र काढण्यासाठी तुम्हाला इतके पैसे मोजावे लागणार आहेत ज्यात तुम्ही दुबईची आलिशान ट्रिप करू शकता.    

अर्शद वारसीच्या 'या' 150 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यामध्ये तुम्हालाही राहायचंय? एका रात्रीचं भाडं किती?

Arshad Warsi : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्यानं नुकत्याच आता त्याच्या गोव्यात असलेल्या कासा झेन या 150 वर्ष जुन्या पोर्तुगीज घराची एक झलक दाखवली आहे. अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टीनं हे जुनं घर रिस्टोर केलं आहे. त्याचीच एक झलक अर्शद वारसीनं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

अर्शद वारसीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. अर्शदनं शेअर केलेल्या या व्हिडीओत त्याच्या 5 बेडरूम घराची झलक दाखवली आहे. त्याचं हे घर नॉर्थ गोवामध्ये आहे. त्याच्या घरात फक्त एकाच विशिष्ठ रंगाचा वापर केला असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नसून वेगवेगळ्या रंगांचा वापर केला आहे. वेगवेगळ्या रंगांची छटा त्याच्या घरात पाहायला मिळत आहे. त्याच्या घराच्या आजुबाजूला झाडं लावण्यात आली आहे. तर एक सुंदर असा स्विमिंग पूल देखील आहे.  त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुंदर असं फर्निचर, कपाटं, खुर्च्या, टेबल आणि काऊचे दिसत आहेत. त्याशिवाय सुंदर अशा वेगवेगळ्या डेकोरेशनच्या वस्तू असून त्यासोबत इनडोअर प्लॅन्ट देखील आहेत. अर्शद म्हणाला, 'गोव्यातल्या माझ्या सुंदर घराबद्दल मला अजिबात खात्री नाही. मला माझ्याच घराचं वेड लागलं आहे. दररोज, आराम करण्यासाठी एक नवीन जागा असते.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जर कोणत्या टुरिस्टला फिरायला आल्यानंतर इथे राहायचं असेल तर त्यांना किती पैसे द्यावे लागतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याविषयी जाणून घेऊया... वाईल्डफ्लावर व्हिलासची टीम ही प्रॉपर्टी मॅनेज करते आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरात एक रात्र घालवायची असल्यास संपूर्ण घर हे 75 हजार रुपये त्यासोबत टॅक्स असं मिळू शकतं. 

हेही वाचा : राखी सावंतने दिली 'जय पाकिस्तान' घोषणा; मनसे म्हणाली 'हिला हाकलवून लावा', VIDEO व्हायरल

दरम्यान, अर्शद हा लवकरच 'जॉली एलएलएबी 3' या चित्रपटात दिसणार आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन  सुभाष कपूर दिग्दर्शन करणार आहेत. तर हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय तो वेलकम टू द जंगल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी, रवीना टंडन, लारा दत्ता, दिशा पटानी, जॉनी लिवर आणि राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Read More