Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sonali Phogat यांच्या मृत्यूनंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला सतावतेय भिती

सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी अनेक रहस्य समोर येतात ही अभिनेत्री का म्हणतेय, 'मला भिती वाटतेय...'  

Sonali Phogat यांच्या मृत्यूनंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला सतावतेय भिती

मुंबई : टिकटॉक स्टार आणि बीजेपी नेता सोनाली फोगट (Sonali Phogat ) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) गोव्यात निधन झालं. सोनाली फोगट यांच्या मृत्यूनंतर रोज अनेक खुलासे समोर येत आहेत. सर्वप्रथम हृदयविकाराच्या झटक्या सोनाली यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली, पण त्यांच्या कुटुंबाने सोनाली यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सोनाली यांच्या शरीरावर जखमा समोर आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले. 

गोवा पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. सोनाली यांच्या निधनाबाबत अनेक गोष्टी समोर येत असताना अभिनेत्री अर्शी खानने भिती व्यक्त केली आहे.  अर्शी खानने नुकताच सोनाली फोगट यांत्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. 

fallbacks

सोनाली म्हणाली, 'फक्त बिग बॉसमध्येच नाही तर, शोनंतर देखील आमच्यातील संबंध चांगले होते. आम्ही दोघींना कायम एकमेकींची साथ दिली आहे. एकत्र वेळ व्यतीत केला आहे. सोनालीने माझी आई प्रमाणे काळजी घेतली आहे. कायम फोन करून त्या माझी खुशाली विचारायच्या...'

सोनाली यांच्या निधनानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल अर्शी खान म्हणाली, 'व्हिडीओ पाहून मला मी पूर्णंपणे घाबरली आहे. अपराधी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही. मला खात्री आहे की यामागे काहीतरी मोठं आहे. त्यांना न्याय मिळावा अशी मी देवाकडे प्रार्थना करते.' असं देखील अर्शी खान म्हणाली. 

Read More