Marathi News> मनोरंजन
Advertisement

Arshi Khanने डिझायनर नाईटीमध्ये केला बोल्ड डान्स, व्हिडिओ व्हायरल

'अर्शी खान बिग बॉसच्या घरात परिधान केलेल्या तिच्या डिझायनर नाईटीमुळे ओळखली जाते. 

Arshi Khanने डिझायनर नाईटीमध्ये केला बोल्ड डान्स, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : 'बिग बॉस' फेम अर्शी खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी ती सतत व्हिडिओ आणि फोटो शेअर करते. आता अर्शी खानने बादशाहच्या 'पानी पानी' गाण्यावर डान्स करत तिच्या डिझायनर नाईटीजचं कलेक्शन फ्लॉन्ट केलं आहे. 

दाखवली डान्सची झलक
या व्हिडिओमध्ये अर्शी खान अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने काही क्षणात एकामागोमाग एक 5 रंगांच्या नाईटी बदलल्या आहेत.  हा व्हिडिओ शेअर करत अर्शीने आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. तिचा हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

चाहते करतायेत कौतुक 
हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ओह मेरी नाईटीज का कलेक्शन'. आता हा व्हिडिओ पाहून चाहते तिच्या कलेक्शनचं कौतुक करत आहेत. अर्शीच्या कलेक्शनमधील बहुतेक नाईटीज हायस्लिट आहेत.

'बिग बॉस' आली आठवण 
अर्शी खान अजूनही बिग बॉसच्या घरात परिधान केलेल्या तिच्या डिझायनर नाईटीमुळे ओळखली जाते. तिने बिग बॉसमध्ये सांगितले होतं की, 'नाईटीजवर माझं खूप प्रेम आहे'. आपल्याकडे 5000 हून अधिक नाईटीज आहेत असं देखील तिने सांगितलं होतं.

Read More