Marathi News> मनोरंजन
Advertisement

ईदच्या आधी अर्शी खानवर शस्त्रक्रिया; चेहऱ्यावर जबर मार

'बिग बॉस' फेम अर्शी खानवर कुस्तीच्या सरावाच्या वेळी झालेल्या अपघातानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.

ईदच्या आधी अर्शी खानवर शस्त्रक्रिया; चेहऱ्यावर जबर मार

मुंबई : बिग बॉस फेम अर्शी खानवर कुस्तीच्या सरावाच्या वेळी झालेल्या अपघातानंतर दातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या बद्दल सांगताना अर्शी खान म्हणाली की, ''मी कुस्तीचा सराव करत असताना चुकून माझ्या चेहऱ्यावर एक फाईट लागली आणि माझे दातांना दुखापत झाली आणि माझे दात पडले. मला खूप वेदना होत होत्या. म्हणून मला ताबडतोब डेंटिस्टकडे जावं लागलं. 

लग्नाबद्दल बोलताना अर्शी म्हणाली की, माझं कुटुंब माझं लग्न करण्यास उत्सुक आहे आणि मला येथे अनेक लग्नाचे प्रस्तावही येत आहेत. पण मी अजून लग्न केलेलं नाही. आणि याचा विचारही केला नाही.

fallbacks

माझ्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, मी येथे माझ्या लग्नासाठी पोहचली आहे का? तर मी माझ्या चाहत्यांना सांगू ईच्छिते की, मला आधीच वेदना होत आहेत, कोणत्याही मुलीला दातदुखीसह वधू बनण्याचा आनंद मिळणार नाही. मी येथे ईदचा आनंद लुटण्यास उत्सुक आहे.

Read More