Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बिग बॉस'नंतर अर्शी खान ब्रिटन शो 'बिग ब्रदर्स'मध्ये झळकणार

'बिग बॉस ११' ची स्पर्धक असलेली अर्शी खान ब्रिटीश शो 'सेलिब्रिटी बिग ब्रदर' मध्ये सहभागी होणार आहे.

 'बिग बॉस'नंतर अर्शी खान ब्रिटन शो 'बिग ब्रदर्स'मध्ये झळकणार

मुंबई : 'बिग बॉस ११' ची स्पर्धक असलेली अर्शी खान ब्रिटीश शो 'सेलिब्रिटी बिग ब्रदर' मध्ये सहभागी होणार आहे.

खुद्द अर्शी खानने यासंदर्भात माहिती दिलीय. हा शो खूप मजेशीर असून वेगळा अनुभव असेल असे तिने सांगितले. 

'बिग ब्रदर्स'

 'बिग बॉस' नंतर आता मी 'बिग ब्रदर्सस'साठी तयार असल्याचे वाटतेय. अनोळखींसोबत वेळ घालवून मी भारताचे प्रतिनिधित्व करु शकेन असेही अर्शीने म्हटले.

'बिग बॉस ११' मध्ये धम्माल केल्यानंतर अर्शीने बोल्ड फोटोशूट केलं होत. यामध्ये ती आपल्या 'बिंदास अॅण्ड बोल्ड' अंदाजात दिसून आली. 

नवी मालिका 

 आर्शी पुन्हा एकदा टीव्ही स्क्रिनवरही दिसणार आहे. रियॅलिटी शो 'एंटरटेन्मेंट की रात' नंतर अर्शी टीव्ही मालिका 'मेरी हानिकारक बीवी' मध्ये दिसणार आहे. 
  

Read More