Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aryan Khan Drugs Case : आर्यनला NCB ची भीती सुरूवातीपासूनच, असे दिले होते संकेत

आर्यन खान या फोटोमुळे ट्रोल 

Aryan Khan Drugs Case : आर्यनला NCB ची भीती सुरूवातीपासूनच, असे दिले होते संकेत

मुंबई : शाहरूख खानची संकट काही कमी होताना दिसत नाही. किंग खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात जामीन मिळत नाही. ज्यामुळे शाहरूख खान आणि गौरी खान खूप तणावात आहे. या दरम्यान आर्यनची जुनी एक पोस्ट सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे तो खूप ट्रोल झाला आहे. 

दोन वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल 

ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यन खानला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यनसह आठ जणांना क्रूझमधील एका रेव्ह पार्टीतून अटक केली होती. आर्यनच्या समर्थनार्थ अनेक सेलेब्स पुढे आले आहेत, पण या दरम्यान आर्यन खानचा दोन वर्षांचा फोटो आणि त्यावर लिहिलेली कॅप्शन चर्चेत आली आहे. ही कॅप्शन लिहिताना, आर्यनलाही माहित नसेल की भविष्यात ही कॅप्शन सत्य होणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बर्फाळ प्रदेशात बसलाय आर्यन 

आर्यन खान त्याची बहीण सुहानासारखा सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. त्याने फक्त काही फोटो पोस्ट केले आहेत. 18 मार्च 2019 रोजी आर्यनने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तो हातात बर्फ घेऊन बसला आहे. हा फोटो फ्रान्सच्या बर्फाळ डोंगरांचा आहे. या फोटोत तसं वेगळं असं काहीच नाही. 2 ऑक्टोबर 2021 पूर्वी त्या फोटोची कॅप्शन देखील अगदी सामान्य असेल. परंतु NCB च्या तावडीत आल्यानंतर आता युझर्सना ही कॅप्शन वाचून आश्चर्य वाटत आहे. 

शाहरूख खानने बदलला वकील

शाहरुख खानने अमित देसाईला वकील म्हणून नेमले आहे. अमित देसाईंनी 2002 च्या 'हिट अँड रन' प्रकरणात सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती. आर्यन खानला तुरुंगातून बाहेर आणण्याची जबाबदारी आता अमित देसाई घेतील. 11 ऑक्टोबर रोजी अमित आर्यन खानसाठी न्यायालयात गेले. जामीन अर्ज दाखल केल्यानंतर, एनसीबी कौन्सिलने न्यायालयाला सांगितले की, एजन्सीला उत्तर दाखल करण्यासाठी आणखी एका आठवड्याची आवश्यकता आहे.

Read More