Marathi News> मनोरंजन
Advertisement

आर्यन खानने या 5 चित्रपटांमध्ये केलंय काम, तुम्ही पाहिलंय पण ओळखलं नसेल

 आर्यन खानच्या (Aryan Khan) कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर फार कमी लोकांना माहित आहे की त्याने बऱ्याच वर्षांपूर्वीच इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आहे.

आर्यन खानने या 5 चित्रपटांमध्ये केलंय काम, तुम्ही पाहिलंय पण ओळखलं नसेल

मुंबई : शाहरुख खानच्या मुलाची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच वादात सापडली आहे. एका क्रूज पार्टी दरम्यान, एनसीबीने आर्यन खानसह काही जणांना अटक केली आहे आणि या पार्टीमध्ये ड्रग्जचा खुलेआम वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आर्यन खानच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर फार कमी लोकांना माहित आहे की त्याने बऱ्याच वर्षांपूर्वीच इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आहे. 

आर्यन खानने कोणत्या चित्रपटांमध्ये काम केले?

1. कभी अलविदा ना कहना

फार कमी लोकांना माहित आहे की आर्यन खानने शाहरुख खान आणि प्रीती झिंटाच्या 'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटातही काम केले आहे.

fallbacks

2. कभी खुशी कभी गम

आर्यन खानने करण जोहरच्या बॅनरखाली सुपर-डुपर हिट चित्रपट 'कभी खुशी कभी गम' मध्ये बालकलाकार म्हणून काम केले.

3. हम हैं लाजवाब

आर्यन खानने काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'हम है लाजवाब' या अॅनिमेटेड चित्रपटात व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केले. या चित्रपटासाठी आर्यन खानला सर्वोत्कृष्ट डबिंग चाईल्ड व्हॉईस आर्टिस्टचा पुरस्कारही मिळाला.

4. द लायन किंग

आर्यनने 'द लायन किंग' चित्रपटातही डबिंग केले होते. आर्यन खानने सिंबा या चित्रपटाच्या पात्राला आवाज दिला.

5. पठाण

शाहरुख खानचा आगामी पठाण चित्रपट सतत चर्चेत असतो. जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना अनेक अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत आणि आर्यन खाननेही या अॅक्शन सीक्वेन्समध्ये अनेक इनपुट दिले आहेत.

Read More