Marathi News> मनोरंजन
Advertisement

दुसऱ्या लग्नानंतर 57 वर्षीय आशिष विद्यार्थी एकटेच गेले फिरायला? चाहते म्हणाले, "मग लग्न..."

Ashish Vidyarthi Second Marriage Viral Video: आशिष यांनी 25 मे रोजी 50 वर्षीय फॅशन डिझायनरशी लग्न केलं. वयाच्या 57 व्या वर्षी आशिष लग्नबंधनात अडकल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांनी आता पोस्ट केलेल्या व्हिडीओवरही कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

दुसऱ्या लग्नानंतर 57 वर्षीय आशिष विद्यार्थी एकटेच गेले फिरायला? चाहते म्हणाले,

Ashish Vidyarthi Instagram Post: बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारणारे अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) नुकतेच लग्नबंधनात अडकले. वयाच्या 57 व्या वर्षी 25 मे 2023 रोजी आशिष यांनी दुसरं लग्न (Ashish Vidyarthi Second Marriage) केलं. आशिष यांनी अचानक आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्यांच्या चाहत्यांना तर धक्का बसलाच पण त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. आशिष फॅशन डिझायनर रुपाली बरुआ यांच्याबरोबर लग्न बंधनात अडकल्यानंतर आता भटकंतीसाठी गेले आहेत. मात्र त्यांनी नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये ते एकटेच दिसत असल्याने चाहत्यांनी 'एकटेच फिरायलाला गेलात की काय?' असा प्रश्न त्यांना विचारला आहे.

आशिष यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये काय आहे?

आशिष यांनी 25 मे रोजी 50 वर्षीय रुपाली बरुआ यांच्याशी लग्न केल्यानंतर ते सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये भटकंतीसाठी गेले आहेत. आशिष हे सध्या आफ्रिकेमधील कांगो देशात आहेत. त्यांनी तेथूनच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ते एका रिसॉर्टमध्ये मासे खाण्याचा आनंद घेत असल्याचं दिसत आहेत. "स्मोकी कॅप्टन फिश खातोय. यामध्ये फार तिकट असा पिली पिली मुब्झी सॉस असतो," अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. याच कॅप्शनमध्ये त्यांनी आपण कांगो नदीच्या खोऱ्याजवळ असल्याचंही म्हटलंय. व्हिडीओमध्ये ते आधी एका रिसॉर्टमधील बाल्कनीमध्ये उभे असल्याचं आणि पुढे नजर जाईल तिथपर्यंत मोकळं रान असल्याचं दिसत आहे. नंतर आशिष हे खाण्याच्या टेबलवर बसले असून ते मच्छी खाताना दिसत आहेत. फार तिखट अशा सॉसमध्ये तयार करण्यात आलेल्या या मच्छीचा पहिला घास घेतल्यानंतर आशिष यांना ठसका लागतो. नंतर जिभेची आग शांत करण्यासाठी ते माश्याबरोबर आलेलं इतर अॅपेटायजर खाताना व्हिडीओत दिसत आहेत.

चाहत्यांना पडले प्रश्नच प्रश्न

आशिष यांची लग्नानंतरची ही पहिलीच परदेशवारी असल्याने अनेकांनी आशिष यांच्या या व्हिडीओ खाली कमेंट सेक्शनमध्ये त्यांची दुसरी पत्नी रुपाली बरुआ यांच्याबद्दल विचारपूस केली आहे. आशिष हे हनिमूनसाठी एकटेच गेलेत की काय अशी शंका त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. "एकट्याने फिरणं आणि फूड ब्लॉगिंग हे तुमचं प्रेम आहे तर मग लग्न करण्याची काय गरज होती," असा प्रश्न एका चाहत्याने विचारला आहे. तर अन्य एकाने, "आता तरी घरचं जेवण खा" असा खोचक सल्ला आशिष यांना दिला आहे. "तुम्ही वयाच्या 57 व्या वर्षी 27 वर्षीय तरुणासाखं एन्जॉय करत आहात," असं अन्य एकाने म्हटलं आहे. 

fallbacks

उत्तम फूड व्हॉगर

आशिष हे एक उत्तम फूड व्हॉगरही आहेत. त्यांनी अगदी मुंबईपासून ते देशातील अनेक शहरांमधील वेगवेगळ्या पदार्थांचे व्हॉग आपल्या चॅनेलवर पोस्ट केले आहेत. त्यांनी पोस्ट केलेला हा नवा व्हिडीओही असाच एक व्लॉग असला तरी केवळ लग्न झालं असल्याने आशिष यांना या व्हिडीओवर त्यांच्या पत्नीसंदर्भातील प्रश्न विचारले जात आहेत.

Read More