Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ashok Saraf 75th birthday : अशोक सराफ यांच्या वाढदिवसादिवशी निवेदिता सराफ यांच्याकडून खास घोषणा

सुपरस्टार अशोक सराफ यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. 

Ashok Saraf 75th birthday : अशोक सराफ यांच्या वाढदिवसादिवशी निवेदिता सराफ यांच्याकडून खास घोषणा

मुंबई : सुपरस्टार अशोक सराफ यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस खास करण्यासाठी कुटूंबीयांनी तसंच अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अशोक मामा हे अगदी ७० च्या शतकापासून सिनेसृष्टीत काम करुन प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत. त्यांनी त्यांची प्रत्येक भूमिका डोक्यावर घेतली. 

त्यांच्या वाढदिवसानिमीत्त शिवाजी मंदिरला त्यांच्या व्हॅक्युमक्लीनर या नाटकाचा प्रयोग करत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे कुटूंबीय तसेच अनेक कलाकारही उपस्थित होते. कलाकार व चाहत्यांच्या गर्दीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

यासोबतच या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मोठी घोषणा केली.  ही घोषणा ऐकून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसणार एवढं मात्र नक्की शोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचं मी बहुरूपी  हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. 

ही घोषणा करत त्या म्हणाल्या की, या पुस्तकाच्या विक्रितीन जो निधी गोळा होणार आहे तो, अशा गरजून कलाकारांना देण्यात येणार आहे, ज्यांचेकडे काही काम नाही. ज्यांना काही व्याधी जडल्या आहेत, अशा कलाकारांच्या मदतीसाठी हा निधी वापरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबर अशोक सराफ यांनी सर्वांचे आभार मानले. शिवाय प्रेक्षकांच्या प्रेमामुळं मी आहे असं म्हणत यापुढं देखील माझ्यावर असचं प्रेम करत राहण्याची विनंती देखील अशोक सराफ यांनी केली.

Read More