स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा लवकरच साजरा होणार आहे. या सोहळ्याचं यंदा पाचवं वर्ष आहे. या निमित्ताने अवॉर्ड शोमध्ये 'महाराष्ट्र भूषण' या पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले. अशोक सराफ यांनी अनेक वर्षे सिनेमे, मालिका आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘शेजारी शेजारी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ यासारखे अनेक सिनेमांमधून मनोरंजन केलं आहे. यावेळी अशोक सराफ यांचा सन्मान म्हणून वेगवेगळे कार्यक्रम सादर केले.
‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना एक आभासी फोन आला. हा फोन दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीचा नसून त्यांचे जिवलग मित्र लक्ष्मीकांत बेर्डे यांचा होता. अनेक वर्षे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राचं भरभरुन कौतुक केलं आहे.
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे असं हे त्रिकूट होतं. अशोक सराफ यांच्या सन्मानार्थ महेश कोठारे, निवेदिता सराफ आणि संपूर्ण सिनेसृष्टी उपस्थित होते. पण अशोक सराफ यांचा जिवलग मित्र लक्ष्मीकांत बेर्डे मात्र नव्हते. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आजारपणामुळे 16 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले. त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव अनेकांना यावेळी झाली.
पण याचवेळी कार्यक्रमादरम्यान एक फोन येतो. त्यामधून आवाज येतो की, “हॅलो हॅलो अशोक…. अरे आपण जवळपास ५० चित्रपट एकत्र केले मज्जा… तुझा आज होणारा सन्मान पाहून डोळे भरून आले बघ. हा लक्ष्या या अशोकशिवाय नेहमीच अपूर्ण राहील. ही दोस्ती तुटायची नाय….”
आभासी फोनवर जवळचा मित्र लक्ष्मीकांत बेर्डे या जवळच्या मित्राचे शब्द ऐकू येताच अशोक सराफ यांचे डोळे पाणावले. निवेदिता सराफ, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, रुपाली भोसले यांसारख्या कलाकारांना देखील अश्रू अनावर झालेत. हा कार्यक्रम 16 मार्च रोजी स्टार प्रवाहवरील मालिकेत दाखवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होणार आहे.