Marathi News> मनोरंजन
Advertisement

आश्रम फेम अभिनेत्रीने बोल्ड सीनसाठी वडिलांची घेतली परवानगी,वडिल म्हणाले बिंदास...

आश्रम फेम अभिनेत्री अनुरिता झा या सीरीजच्या पहिल्या सीझनपासून आहे. बाबा निराला सोबत ती ही आश्रम चालवताना दिसते आहे. या सीरीजमध्ये तिनेही बोल्ड सीन दिले आहेत. या सीनबाबत तिने आता प्रथमच प्रतिक्रिया दिलीय. तसेच बोल्ड सीनबाबत वडिलांशी परवानगी घेतानाचा  किस्सा सांगितला.  

आश्रम फेम अभिनेत्रीने बोल्ड सीनसाठी वडिलांची घेतली परवानगी,वडिल म्हणाले बिंदास...

मुंबई : आश्रम फेम अभिनेत्री अनुरिता झा या सीरीजच्या पहिल्या सीझनपासून आहे. बाबा निराला सोबत ती ही आश्रम चालवताना दिसते आहे. या सीरीजमध्ये तिनेही बोल्ड सीन दिले आहेत. या सीनबाबत तिने आता प्रथमच प्रतिक्रिया दिलीय. तसेच बोल्ड सीनबाबत वडिलांशी परवानगी घेतानाचा  किस्सा सांगितला.  

"मी माझ्या घरच्यांना आधीच सांगितलं होतं. म्हणूनच मी खूप उत्साहित आहे. मी इंटिमेट सीन करण्याची ही माझ्यासाठी पहिलीच वेळ आहे. मी माझ्या कारकिर्दीत असे कधी केले नाही. हे करण्याआधी मी माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना म्हणाली, 'बाबा हे असं असणार आहे, मी काय करू? यावर तो म्हणाला, हो कर, ते कर. काही हरकत नाही.  

अनुरीताने 'आश्रम' मालिकेचे दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासोबत काम करण्याचा तिचा अनुभवही शेअर केला. इंटिमेट सीन करताना प्रकाश झा यांनी तिला कसे सुरक्षित वाटले हे त्याने सांगितले. अनुरीता म्हणाली की, प्रकाश झा एक कलाकार म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि वातावरण पूर्णपणे सुरक्षित ठेवतात. म्हणून इंटिमेट सीन शूट करणे सोपे होते. 

दरम्यान अनुरिता पुन्हा एकदा 'आश्रम 3' मध्ये कविताच्या भूमिकेत दिसणार आहे. MX Player वर 3 जून रोजी ही सीरीज रिलीज होणार आहे.

Read More