Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिका शोएबचा हळदी समारंभ....

ससुराल सिमर का या मालिकेची अभिनेत्री दीपिका कक्कड आणि त्याच मालिकेत तिचा को स्टार असलेला शोएब इब्राहिम यांचे लवकरच लग्न होणार आहे.

दीपिका शोएबचा हळदी समारंभ....

नवी दिल्ली : ससुराल सिमर का या मालिकेची अभिनेत्री दीपिका कक्कड आणि त्याच मालिकेत तिचा को स्टार असलेला शोएब इब्राहिम यांचे लवकरच लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. दीपिका-शोएबने हळदीचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. त्यांची जोडी चांगलीच लोकप्रिय ठरली आहे.

लवकरच अडकणार विवाहबंधनात

दीपिका आणि शोएबचे लग्न २६ फेब्रुवारीला होणार आहे. लग्न भोपाळमध्ये होणार आहे. त्यासाठी हे दोघेही भोपाळला रवाना झाले आहेत. हळदीच्या विधीत दोघेही अत्यंत आनंदी दिसत आहे. ससुराल सिमर का मालिकेच्या निमित्ताने ते दोघे भेटले आणि मैत्री ते प्रेम असा प्रवास घडला. ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघेही लग्न करत आहेत.

पहा हळदीचे फोटोज...

 

 #dodilmilrahehain Photography - @theglamwedding_getthelook

A post shared by shoaib Ibrahim (@shoaib2087) on

या जोडीने अलिकडेच इंस्‍टाग्रामवर काही रोमांटिक फोटोज शेअर केले. दीपिकाचा 'दिलवाले दुल्‍हनिया ले जाएंगे' सिनेमातील सिमरनचा अंदाज दिसत आहे.

पहा फोटोज...

 

 #dodilmilrahehain

A post shared by shoaib Ibrahim (@shoaib2087) on

दीपिका लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे. ती जे.पी. दत्ता यांच्या पलटन सिनेमात झळकेल. याची माहिती तिने अलीकडेच सोशल मीडियावरून दिली.

 

Read More