Marathi News> मनोरंजन
Advertisement

वयाच्या 14 व्या वर्षी आमिर खानची मुलगी इरासोबत घरातील या व्यक्तीने केलं घाणेरडं कृत्य

इरा खान बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये होती, ज्यासाठी तिने अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले होते

वयाच्या 14 व्या वर्षी आमिर खानची मुलगी इरासोबत घरातील या व्यक्तीने केलं घाणेरडं कृत्य

मुंबई : आमिर खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. आमिर खान  इतकंच नाही तर प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे तो खूप चर्चेत असतो. अलीकडेच अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने एक मोठा खुलासा केला आहे की ती 14 वर्षांची असताना तिच्या जवळच्या व्यक्तीने तिला लैंगिक छळाची शिकार बनवलं होतं. त्यामुळेच आईने तिला सेक्स एज्युकेशन दिलं. 

इरा खान बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये होती, ज्यासाठी तिने अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले होते. इरा खानने एक व्हिडीओ व्हायरल केला होता ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, 'त्याला आता वाटत नाही की, ती खूप नकारात्मक किंवा दुःखी आहे. ती हळूहळू गोष्टी समजून घेत आहे आणि त्यातून बाहेर पडत आहे. याआधी इराने तिच्या बालपणात घडलेल्या घटनेबाबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही पोस्ट केला होता. यात तिने सांगितलं होतं की, जेव्हा ती 14 वर्षांची होती, तेव्हा तिच्या ओळखीच्या व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

तिने पुढे सांगितलं की, यावेळी तिला माहित नव्हतं की तिच्यासोबत काय होत आहे. किंवा तो व्यक्ती तिच्यासोबत काय करत आहे. हे सगळं समजायला तिला एक वर्ष लागलं असं तिने सांगितलं. तिला समजताच  लगेचच आई-वडिलांना तिने ई-मेल केला. यानंतर तिच्या पालकांनी तिला या परिस्थितीतून बाहेर काढलं.

एवढंच नाही तर इरा खानने सांगितले की, ती जेव्हा तरुण झाली होती. त्यानंतर तिची आई रीना दत्ताने तिला सेक्स एज्युकेशन बुक दिलं. तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये इरा खानने लिहिलं, "मला वाटत नाही की मी याआधी स्वत:कडे इतकं कधी पूर्णपणे पाहिलं आहे. जेव्हा मी लहान होते, तेव्हा माझ्या आईने मला सेक्स एज्युकेशनचं पुस्तक दिलं होते." मला स्वत:ला आरशात वरुन खालपर्यंत पाहायचं होतं. माझं शरीर खूप बदललं होतं आणि आता पुढे खूप प्रवास होणार होता.

Read More