Marathi News> मनोरंजन
Advertisement

अथिया शेट्टी 2023 मध्ये केएल राहुलसोबत घेणार सप्तपदी? वडील सुनील शेट्टी यांनी दिली हिंट

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहुलसोबतच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असते. 

अथिया शेट्टी 2023 मध्ये केएल राहुलसोबत घेणार सप्तपदी? वडील सुनील शेट्टी यांनी दिली हिंट

मुंबई :  भारतीय क्रिकेटचा सलामीवीर के. एल. राहुल (KL Rahul ) आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, हे दोघे लग्न (Marriage) कधी करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार हे दोघ विवाहबंधनात लवकरच अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून  अनेकांना उत्सुकता होती.

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहुलसोबतच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असते. अथिया आणि राहुल अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि आता चाहत्यांनाही त्यांनी लवकरच लग्न करावं अशी इच्छा आहे. याच कारणामुळे राहुल आणि अथिया यांच्या लग्नाबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. आता अथिया आणि केएल राहुलच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी येत आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर बी-टाऊनची ही जोडी पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये लग्न करू शकतं. खुद्द अथियाचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनी याबाबत मोठी सूचना दिली आहे.

'धारावी बँक'च्या प्रमोशनदरम्यान सुनील शेट्टीने अथियाच्या लग्नाबाबत केलं वक्तव्य 
आजकाल सुनील शेट्टी त्याच्या आगामी 'धारावी बँक' या सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच 'धारावरी बँक'च्या लाँचिंग कार्यक्रमादरम्यान सुनीलने अथिया आणि केएल राहुलच्या लग्नावर मौन सोडलं. मुलाखतीदरम्यान जेव्हा मीडियाने सुनीलला अथियाचं लग्न कधी होणार असं विचारलं तेव्हा सुनील शेट्टी म्हणाले, 'लवकरच.' सुनील शेट्टीच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

होतेय लग्नाची तयारी
गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की, अथिया शेट्टी आणि केएल राहुल 2023 मध्ये लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. इतकंच नाही तर पिंकविलामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अथिया आणि केएल राहुल खंडाळ्यात सुनील शेट्टीच्या 'जहाँ'च्या घरी सात फेरे घेतील. एका रिपोर्टनुसार, लग्नासाठी वेडिंग प्लानर बुक करण्यात आला आहे.

Read More