Marathi News> मनोरंजन
Advertisement

अवनीत कौरच्या नव्या फोटोशूटनं एकच चर्चा; 'दुसरी वहिणी...'; लोकांनी विराट कोहलीचं नाव घेत उडवली खिल्ली

Avneet Kaur : अवनीत कौरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. 

अवनीत कौरच्या नव्या फोटोशूटनं एकच चर्चा; 'दुसरी वहिणी...'; लोकांनी विराट कोहलीचं नाव घेत उडवली खिल्ली

Avneet Kaur : सोशल मीडिया सेन्सेशन अवनीत कौर ही सतत कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विराट कोहलीनं तिच्या फॅनपेज पोस्टला चुकून लाइक केलं. पण त्यानंतर विराटनं त्यावर स्पष्टीकरण दिलं आणि सांगितलं की त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं अलगोरिथम बदलल्यानं चुकून त्याच्याकडून ते लाइक झालं. पण आता अवनीतनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी चांगलेच कमेंट करताना दिसत आहे आणि त्यावर कमेंट करत 'दुसरी वहिणी' म्हणत आहेत.

अवनीत कौर ही फक्त 23 वर्षांची आहे पण इन्स्टाग्रामवर तिचे 31.8M फॉलोवर्स आहेत. तिनं कमी वयात प्रेक्षकांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केलं आहे. मालिकांशिवाय ती चित्रपटांमघ्ये देखील दिसली आहे. तिनं आता विराट कोहलीच्या लाइकच्या प्रकरणानंतर नवीन फोटोशूट केलं आणि त्याचे फोटो तिनं शेअर केले आहेत. त्यात अवनीत खूप सुंदर दिसत आहे. तिची कातिलाना अदा या फोटोत दिसून येत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

दरम्यान, अवनीनतं हे फोटो शेअर केल्यानंतर काही नेटकऱ्यांची तिची स्तुती केली आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, तुला विराट कोहलीमुळे अटेन्शन मिळालं आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, दुसरी वहिणी. तिसरा नेटकरी म्हणाला, एका लाइकनं संपूर्ण इंटरनेटला हलवून सोडलंय. आणखी एक नेटकरी म्हणाला, विराट कोहलीची गर्लफ्रेंड. दुसरा नेटकरी म्हणाला, विराट कोहली बघत असेल पुन्हा लाइक करण्याची शक्यता आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

हेही वाचा : भारतात सगळ्यात जास्त मानधन घेणारा TV अभिनेता; 8 वर्षांनंतर कमबॅक 1 दिवसासाठी घेतो तब्बल 3.50 लाख

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

दरम्यान, अवनीत ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर रील्फ आणि फोटो शेअर करताना दिसते. लेटेस्ट फोटोशूटचे तिने बिटीएस देखील शेअर केले आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर अवनीत कौरच्या कमेंट सेक्शनमध्ये फक्त विराट कोहलीचं नाव आहे. सगळे अवनीतची मज्जा घेताना दिसत आहेत. अवनीतचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अवनीत ही अनेक ब्रॅंडच्या जाहिराती देखील करते. फक्त म्युझिक अल्बम, मालिका आणि चित्रपट नाही तर ती ब्रॅन्ड्सच्या जाहिराती करताना दिसते. 

Read More