Marathi News> मनोरंजन
Advertisement

आयतसाठी वडिलांची भावूक पोस्ट

सलमानच्या भाचीची पहिली झलक   

आयतसाठी वडिलांची भावूक पोस्ट

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि त्याची बहिण अर्पिता खान शर्मा या दोन भावंडांमधील प्रेम प्रत्येकाला माहित आहे. अर्पिताने आपल्या भावाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे खान आणि शर्मा कुटुंबामध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. तर अर्पिताने भावाला दिलेली ही गोड भेट भाईजानच्या चाहत्यांना फार आवडली आहे. 

२७ डिसेंबर रोजी अर्पिताने मुलीला जन्म दिला. तर अभिनेता आयुष शर्माने आयतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये अर्पिता, आयुष, अहिल आणि नुकताच खान आणि शर्मा कुटुंबात दाखल झालेली आयत एकत्र दिसत आहे. 

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आयुषने आपल्या मुलीसाठी एक भावूक पोस्ट देखील लिहिली आहे. 'या सुंदर जगात आयत तुझं स्वागत आहे. तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात फार आनंद आला आहे . सर्वांचं आयुष्य असचं प्रेमाने आणि आनंदाने भरून दे.'

आयुषची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टच्या माध्यमातून आयुष त्याच्या मुलीप्रती असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. 

अर्पिताचं हे दुसरं मुलं आहे. अर्पिता आणि आयुष शर्मा यांनी 'आयत' Ayat असं मुलीचं नाव ठेवलं आहे. आयुषने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मुलीचं नाव सांगितलं. अर्पिताने २०१४ मध्ये आयुष शर्मासोबत लग्न केलं होतं. 

३० मार्च २०१६ रोजी अर्पिताने अहिल या तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. आयुषने लग्नानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. २०१८ मध्ये त्याने 'लवयात्री' सिनेमात कामही केलं आहे.  

Read More