Marathi News> मनोरंजन
Advertisement

'माझ्यासाठी राऊंड 2...', आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिराला पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान

Tahira Kashyap Again Diagnosed With Breast Cancer : ताहिरा कश्यपला पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा

'माझ्यासाठी राऊंड 2...', आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिराला पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान

Tahira Kashyap Again Diagnosed With Breast Cancer : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आणि चित्रपट निर्माती-लेखिका ताहिरा कश्यपनं 2018 मध्ये ब्रेस्ट कॅन्सरला यशस्वी झुंज दिली. आता पुन्हा एकदा तिला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहेत. ताहिरानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याची माहिती दिली. सोशल मीडियावर तिच्या या कठीण काळाविषयी तिनं सांगितलं आहे. तर ताहिरा कश्यपची पोस्ट पाहता नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. 

ताहिरा कश्यपनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की 'सात वर्ष नियमीत चाचणी केल्यानंतर हा एक दृष्टीकोण झालेला असतो. मी सगळ्यांसाठी हेच सुचवणार आहे की ज्यांना रोज मॅमोग्राम करण्याची गरज आहे. माझ्यासाठी हा राउंड 2 आहे. मला पुन्हा एकदा त्याचे निदान झाले आहे.' 

तिनं पोस्टमध्ये कॅप्शन लिहिलं की 'जेव्हा आयुष्य तुम्हाला लिंबू देते तेव्हा लिंबू पाणी बनवायला हवं. जेव्हा आयुष्य तुमच्यावर आणखी उदार होतं आणि पुन्हा तुमच्यावर लिंबू फेकूण मारतं. तेव्हा तुम्ही तो लिंबू घेऊन त्याला शांतीनं स्वत: च्या आवडतच्या काला खट्टामध्ये मिळवून घ्या आणि चांगला विचार करत तो काला खट्टा ज्युस प्या. कारण एकतर हे सगळ्यात चांगलं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहित आहे की तुम्ही पुन्हा एकदा सगळ्यात चांगलं काम करणार. नियमित स्क्रीनिंग करा. मॅमोग्रामला घाबरू नका. ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा एकदा. तुमच्या हातात जितकं आहे तितकी तुमची स्वत: ची काळजी घ्या.'

दरम्यान, ताहिरानं शेअर केलेल्या फोटोंवर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनी देखील कमेंट केल्या आहेत. सगळ्यात आधी आयुष्मान खुरानं कमेंट करत 'तू माझी हीरो आहेस', असं म्हटलं आहे. तर तिचा दीर अपारशक्ती कमेंट करत म्हणाला, 'वहिणी तुला खूप घट्ट अशी मिठी. आम्हाला सगळ्यांना माहित आहे की तू लवकर ठीक होणार आहेस.'   

हेही वाचा : रश्मिका मंदानानं कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडासोबत साजरा केला वाढदिवस! Photo पाहताच नेटकरी म्हणाले...

2018 मध्ये ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. ताहिरानं त्यानंतर जागरुकता जागरूकता पसरवली आणि तिच्या या प्रवासाविषयी मोकळेपणानं सांगत गेली. तिनं ब्रेस्ट कॅन्सरचे निशान देखील दाखवले होते. ताहिरानं वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्तानं केस काढलेला फोटो शेअर केला होता. त्यासोबत तिनं कॅन्सरशी लढा देणाऱ्यांचं प्रोत्साहन करणारा एक मेसेजही शेअर केला होता. तिनं ट्रीटमेंट दरम्यानचे काही फोटो देखील शेअर केले होते. 

Read More