मुंबई : 'बागी २' रिलीजच्याआधी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी दोघेही जोरदार प्रमोशन करत आहेत. टीव्ही शोपासून शहरांमध्ये जाऊनही ते जास्तीत जास्त वेळ देत आहेत. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार 'बागी २' जगभरात ४१२५ स्क्रीन्सवर रिलीज केला जाणार आहे.
साजिद नाडियाडवालाच्या बॅनरमध्ये बनणारा सिनेमा 'बागी २' लवकरच सिनेमाघरात दाखल होतोय. प्रेक्षकांनाही याची चांगलीच उत्सूकता लागली आहे. हा सिनेमा साधारण ४५ देशांमध्ये रिलीज होणार आहे. भारतात या सिनेमासाठी ३,५०० स्क्रिन्स मिळणार आहेत.
#Baaghi2 screen count...
— taran adarsh (@taran_adarsh) March 29, 2018
India: 3500... widest release for Tiger Shroff
Overseas: 625... will be releasing across 45 countries
Worldwide total: 4125 screens
परदेशात या सिनेमाला ६२५ स्क्रिन्स मिळणार आहेत. दोन्ही मिळून ४१२५ स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज होईल. ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्शनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली आहे.
'बागी २' सिनेमाचे दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. अॅक्शन्सने भरलेल्या या सिनेमात दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा सिनेमा ३० मार्चला रिलीज होत आहे.