Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेता-दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. 

अभिनेता-दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

मुंबई : अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. दरवेळी प्रमाणे चर्चेत असणारे प्रवीण तरडे यावेळी मात्र जरा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. खरंतर त्यांनी शेअर केलेली एक इंस्टाग्राम पोस्ट पाहून त्यांचे चाहते खूप नाराज झाले आहेत. यावेळी प्रवीण तरडेंनी एक पोस्ट शेअर करत त्यांच फेसबूक अकांऊन्ट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. 

धर्मवीर सिनेमाचा दिग्दर्शक प्रविण  तरडेचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. अभिनेत्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे माझ्या फेबसबुकवरून मेसेज आल्यास त्याला रिप्लाय करू नका असं आवाहनही त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. एका पाठोपाठ एक हिट सिनेमांमुळे प्रवीण यांचा सोशल मीडियावरील वावर प्रचंड वाढला आहे. 

अभिनेता प्रवीण तरडे सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतात. सतत लेटेस्ट अपडेट प्रवीण फेसबुकच्या माध्यमातून देत असतात. अशातच फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानं प्रवीण तरडे यांना मोठा झटका बसला आहे.  प्रविण यांना ही बाब कळताच त्यानं ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.  प्रवीण यांच्या या अकाउंटवरून अनेक खोट्या लिंक्स तसेच फोन नंबरची मागणी केली जात आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

केवळ प्रविणचं नाही तर याआधीही अनेक मराठी कलाकारांचं फेसमबुक अकाउंट अशाप्रकारे हॅक झालं आहे. काही दिवसांआधी 'झिम्मा'चा दिग्दर्शक अभिनेता हेमंत ढोमेचं अकाउंट हॅक झालं होत. तर त्याआधी अभिनेता संतोष जुवेकरनंही फेसबुक हॅक झालं होतं. तसंच अभिनेत्री शुभांगी गोखले यांचही फेसबुक हॅक झालं होतं. त्यांनीही सायबर पोलिसात याची तक्रार नोंदवली होती.

Read More