मुंबई : 'पिंक'फेम अभिनेत्री तापसी पन्नू आणि जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'बदला' सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले. 'क्यू रब्बा इस कदर तोडेया वे, के एक तूकडा ना छोडेया' असे गाण्याचे बोल आहेत. हे गाणे गायक अरमान मलिकने गायले आहे. 'माफ कर देना हर बार सही नहीं होता' अशी टॅग लाइन असलेला 'बदला' सिनेमा गौरी खान, सुनीर खेत्रपाल आणि अक्षय पुरी यांनी 'रेड चिली एन्टरटेन्मेट' बॅनरखाली निर्मित केला आहे. 'बदला' सिनेमा 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या 'कॉन्ट्राटिएम्पो' या स्पॅनिश सिनेमाची रिमेक असणार आहे.
सिनेमातील पहिले गाणे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले आहे.
Kyun rabba iss qadar todeya ve, ke ik tukda na chhodeya.
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 20, 2019
Listen to the heartwarming #KyunRabba from Badla here: https://t.co/aitcBVmD6q @Taapsee @sujoy_g @AmaalMallik @ArmaanMalik22 @kumaarofficial @redchilliesent @iamazure @zeemusiccompany
'बदला' सिनेमाची कथा उद्योजक महिला नयनाच्या जीवनावर आधारलेली आहे. हॉटेलमध्ये नयना तिच्या प्रियकराच्या मृतदेहासोबत बंद खोलीत आढळते. तेव्हा नयना स्वत:ला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी एका प्रतिष्ठित वकिलाची निवड करते. वकील आणि नयना सत्याचा शोध घेताना दिसत आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. सिनेमा 8 मार्च रोजी सिनमागृहात दाखल होणार आहे.