Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी बायकोला घ्यायला जातोय', चालू शूटिंग सोडून 'हा' अभिनेता पोहोचला विमानतळावर, थेट 4 दिवसांनी सेटवर परतला

अभिनेता शहजाद खानने बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यासोबतचा चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळीचा अनुभव शेअर केला आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर 

'मी बायकोला घ्यायला जातोय', चालू शूटिंग सोडून 'हा' अभिनेता पोहोचला विमानतळावर, थेट 4 दिवसांनी सेटवर परतला

Bade Miyan Chote Miyan : बॉलिवूड अभिनेता शहजाद खानने 'बड़े मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात गोविंदासोबत काम केलं होतं. या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील दिसले होते. काही दिवसांपूर्वी शहजाद खानने गोविंदाशी संबंधित एक घटना शेअर केली आहे. यावेळी त्याने हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमधील 'बड़े मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या शूटिंगमधील किस्सा सांगितला आहे. गोविंदाने डेविड धवनला सांगितले की, तो त्याच्या पत्नीला विमानतळावर घ्यायला जात आहे. त्यानंतर तो चार दिवस सेटवर परतलाच नाही.

शहजाद खानने बॉलिवूड ठिकाना या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत. एके दिवशी आम्ही रामोजी फिल्म स्टुडिओमध्ये शूटिंग करत होतो आण गोविंदाने डेविड धवनला विचारले की तो त्याच्या पत्नीला विमानतळावरून घ्यायला जावू शकतो का? विमानतळ रामोजी फिल्म स्टुडिओपासून थोड्या अंतरावर होते. त्यावेळी डेविड धवन यांनी गोविंदाला जाण्याची परवानगी दिली पण लगेच परत येण्यास सांगितले. परंतु, गोविंदा गेला पण परत आलाच नाही. संध्याकाळी डेविड धवन यांना गोविंदाचा फोन आला की तो मुंबईत आहे. गोविंदाने डेविड यांना सांगितले की, तो दुसऱ्या दिवशी परत येईल.

4 दिवसानंतर गोविंदा पोहोचला सेटवर

शहजाद खान पुढे सांगितले की, तुम्हाला डेविड साहेबांची कौतुक करावे लागेल. या अडचणींना कसे तोंड द्यायचे हे त्याला माहिती होते. शहजाद खानने गोविंदासोबत 15-16 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. डेविड धवन म्हणायचे की, काम नाही थांबलं पाहिजे. निर्मात्याचे कोणतेही नुकसान होऊ नये. गोविंदा नसतानाही त्या दिवशी चित्रपटाचे शूटिंग थांबले नाही. तो चार दिवसांनी परत आला.

का सेटवर उशिरा पोहोचायचा गोविंदा?

गोविंदाने स्वतः कबूल केले होते की तो वेळेवर काम करत नाही. मुकेश खन्ना यांच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत गोविंदा म्हणाला होता की, तो कधीच सेटवर वेळेवर पोहोचलो नाही. गोविदा दिलीप कुमार साहेबांचा शिष्य होता. सर्वात प्रथम तो त्याची लय दुरुस्त करायचा. सूर आणि लय जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत तो शूटिंग सेटवर पोहोचत नव्हता. 

Read More