इस्कॉनच्या रेस्टॉरंटमध्ये चिकन खाण्याचा प्रकार: व्हायरल व्हिडिओमध्ये आफ्रिकन-ब्रिटिश व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये येतो आणि सुरुवातीला काउंटरवर काही विचारणा करतो. त्यानंतर, त्याला तिथे नॉनव्हेज न मिळाल्याने तो आपल्या पिशवीतून केएफसीचा चिकन बॉक्स काढतो आणि काउंटरवरचं चिकन खाण्यास सुरुवात करतो. ही कृती पूर्णपणे मुद्दाम, जाणूनबुजून केल्यासारखी वाटते. हे पाहून काउंटरवर उभ्या असलेल्या महिलांनी त्याला रेस्टॉरंटमधून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, तो त्या महिलांची थट्टा करत चिकन त्यांच्याकडे ढकलतो आणि थेट रेस्टॉरंटमध्ये फिरत इतर भाविकांसमोरही चिकन दाखवतो.
बादशहाची कडक प्रतिक्रिया
या घटनेवर बादशहाने आपल्या X अकाउंटवर लिहिलं, 'कोंबडीलाही लाज वाटेल. याला कोंबडीची भूक नव्हती, त्याला तोंडावर चप्पल खायची होती.' यासोबतच त्याने एक महत्त्वाची गोष्टही सांगितली - 'खरी माणूसपणाची ताकद म्हणजे, ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत, त्यांचा सन्मान ठेवणं.' बादशहाच्या या थेट आणि रोखठोक प्रतिक्रियेला हजारो लोकांनी पाठिंबा दिला आहे.
भाविकांचा संताप आणि सोशल मीडियावर टीका
हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी याला 'संस्कृतीचा अपमान' तर काहींनी 'धार्मिक भावनांची चेष्टा' म्हटलं आहे. अनेकांनी अशा वागणुकीसाठी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, 'हे मुद्दाम करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे, यावर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे.' तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, 'शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये नॉनव्हेज खाणं म्हणजे अपमान नाही का? स्वातंत्र्याचा गैरवापर इथं दिसतोय.'
Horrendous.
— Tathvam-asi (@ssaratht) July 19, 2025
This African-British youth entered into ISKCON’s Govinda restaurant - knowingly that it’s pure Veg restaurant - asked if there’s meat available, then pulled out his KFC box and not only ate chicken (chewed like a ), but also offered others working/eating in… pic.twitter.com/TtPJz9Jg7m
इस्कॉन ट्रस्टने कायद्यानुसार कारवाईचे संकेत दिले
या घटनेनंतर इस्कॉन ट्रस्टच्या काही प्रतिनिधींनीही माध्यमांशी बोलताना हे कृत्य जाणूनबुजून केलेलं असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, 'इस्कॉन मंदिर म्हणजे भक्ती आणि अध्यात्माचं स्थान आहे. येथे शुद्ध शाकाहार हे नियमात आलं आहे. त्यामुळे अशी कृती भक्तांच्या श्रद्धेचा अवमान आहे.' त्यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे.
धार्मिक स्थळी जाणूनबुजून नियमभंग करणं ही केवळ अशिष्टता नाही, तर लाखो लोकांच्या भावना दुखावण्यासारखी गोष्ट आहे. समाजमाध्यमांचा उपयोग प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत असताना काही लोक सीमारेषा पार करत असल्याचं हे उदाहरण आहे.