Marathi News> मनोरंजन
Advertisement

मृणाल ठाकूरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर बादशाचं मोठं वक्तव्य, म्हणाला, 'सिक्का उछल गया है'

शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीतील मृणाल ठाकूर आणि रॅपर बादशाह यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.

मृणाल ठाकूरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर बादशाचं मोठं वक्तव्य, म्हणाला, 'सिक्का उछल गया है'

मुंबई : शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीतील मृणाल ठाकूर आणि रॅपर बादशाह यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीतून व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मृणाल आणि बादशाह हातात हात घालून पार्टीतून बाहेर पडताना दिसत आहेत.  त्यानंतर त्यांच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आलं आहे. 2021 मध्ये मृणाल बादशाह आणि निखिता गांधी यांच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. आता बादशाहने मृणाल ठाकूरसोबत डेटिंगच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.

मृणाल ठाकूरने बादशाहसोबतचा एक फोटो शेअर केला आहे
विशेष म्हणजे, मृणालने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर बादशाह आणि शिल्पा शेट्टीसोबत पार्टीचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'दोन फेवरेट.' रॅपरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मृणाल ठाकूरची स्टोरी रिपोस्ट केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोघंही एकमेकांचा हात धरून एकाच कारमधून पार्टीमधून बाहेर पडताना दिसत आहेत.

बादशाहने डेटिंगच्या अफवांवर केलं रिएक्ट
डेटिंगच्या सर्व अफवांदरम्यान रॅपर बादशाहने इंस्टाग्रामवर एक नोट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिलं आहे की, 'तर समजून घेण्याचा प्रयत्न करा, एक नाणं फेकलं गेलं आहे.' मृणाल ठाकूरसोबत बादशाहच्या डेटिंगच्या अफवांवर प्रतिक्रिया देऊन रॅपरने पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. काही लोकांना या गुप्त नोटचा अर्थ आणि बादशाहाला काय म्हणायचं आहे हे समजत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, बादशाहचं पहिलं लग्न जस्मिन मसिहसोबत झालं होतं आणि 2020 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

fallbacks

तर मृणालला 'सीता रामम'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. मृणाल ठाकूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ती नुकतीच 'पिप्पा' चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय 'पूजा मेरी जान'मध्येही अभिनेत्री आपलं अभिनय कौशल्य दाखवणार आहे.

Read More