Marathi News> मनोरंजन
Advertisement

बाहुबली प्रभास अडकणार विवाह बंधनात, कोणासोबत करणार लग्न?

बाहुबली-2 नंतर प्रसिद्ध झालेला बाहुबली लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. बाहुबलीनंतर सलमान खान आणि रणबीर कपूर प्रमाणे तो देखील मोस्ट एलिजेबल बॅचलर क्लबमध्ये आला आहे.

बाहुबली प्रभास अडकणार विवाह बंधनात, कोणासोबत करणार लग्न?

मुंबई : बाहुबली-2 नंतर प्रसिद्ध झालेला बाहुबली लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. बाहुबलीनंतर सलमान खान आणि रणबीर कपूर प्रमाणे तो देखील मोस्ट एलिजेबल बॅचलर क्लबमध्ये आला आहे.

६०० मुलींना प्रस्ताव

बाहुबली-2 नंतप प्रभासला लागोपाठ विवाहाच्या ऑफर येत आहेत. आतापर्यंत जवळपास ६०० मुलींना प्रस्ताव प्रभासला आला आहे. त्याच्या घरच्यांनी मुलगी शॉर्ट लिस्ट देखील केल्याची माहिती मिळते आहे. प्रभासच्या काकांना याबाबत खुलासा केला आहे. कृष्णम राजू यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, 'आम्ही प्रभाससाठी काही प्रोफाईल शॉर्टलिस्ट केल्या आहेत. आम्ही प्रभासच्या लग्नासाठी तयार आहोत. आता फक्त प्रभासच्या हो म्हणण्याचा उशीर आहे. जर प्रभाव हो म्हणतो तर आम्ही शानदार विवाहासाठी तयार आहोत.'

पुढची अपडेट

पण यानंतर आता अपडेट अशी आहे की, प्रभासने देखील लग्नासाठी हो म्हटलं आहे. 2018 मध्येच बाहुबली विवाह करणार आहे. कृष्णम राजू यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'पुन्हा पुन्हा प्रभासच्या लग्नावर प्रश्न उपस्थित केले जातात. पण प्रभास यावर्षी लग्न करणार आहे.'

कोणासोबत अफेयर?

प्रभासचं अनुष्का शेट्टीसोबत अफेयर सुरु असल्याच्या देखील चर्चा आहेत. पण लाजाळू प्रभास अनुष्कासोबत अफेयरची गोष्ट मान्य करण्यास तयार नाही आहे. बाहुबली अनुष्काला आपली मैत्रीण मानतो.

Read More