Marathi News> मनोरंजन
Advertisement

'Balika Vadhu' फेम गुडिया होणार सलमानची 'हिरोईन', बोल्ड अंदाजात करणार रोमान्स

वडिलांच्या निधनानंतर सलमानच्या नव्या अभिनेत्रीला घ्यावा लागला मोठा निर्णय

'Balika Vadhu' फेम गुडिया होणार सलमानची 'हिरोईन', बोल्ड अंदाजात करणार रोमान्स

मुंबई : सुपरस्टार सलमान खानचा 'अंतिम' चित्रपट पुढील महिन्यात 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून चाहत्यांमध्ये याबद्दल उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एका हॉट आणी ग्लॅमरस अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री  टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग आहे आणि टीव्हीच्या सर्वात प्रसिद्ध  मालिकेतील तिच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता सलमानच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून एंट्री केलेली महिमा मकवाना आता चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. महिमाने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिक साकारली आहे. महिमाने तिच्या करियरची सुरूवात वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी केली. 'मोहे रंग दो' मधील तिची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली. 

fallbacks


 
महिमाने लहान असतानाचं वडिलांचं छत्र गमावलं. महिमाचे वडील एक कंस्ट्रक्शन साईटवर काम करत होते. वडिलांच्या निधनानंतर एकट्या महिमाने आई आणि मोठ्या भावाचा सांभाळ केला. महिमाच्या करियरला कलाटणी मिळाली जेव्हा तिला 'बालिका वधू' मालिकेत 'गुडिया' ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 

fallbacks

महिमा मकवाना एक अभिनेत्रीच नाही तर मॉडेल आणि डान्सर देखील आहे. 2017 मध्ये ती तेलुगू चित्रपट 'वेंकटपुरम'मध्ये दिसली होती. या चित्रपटाद्वारे त्याने तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले. महिमाने आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. ती आता सलमान खानच्या 'अंतिम' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता आयुष शर्मासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 

Read More