Marathi News> मनोरंजन
Advertisement

मनमोहक सौंदर्य ! रस्त्यावर फुगे विकणारी मुलगी, आज सोशल मीडिया स्टार

सोशल मीडियावर कधीही कोणाचंही नशीब चमकू शकतं. जर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे जर तुम्ही दाखवून दिलं तर कित्येक लोक तुम्हाला फॉलो करु लागतात. 

मनमोहक सौंदर्य ! रस्त्यावर फुगे विकणारी मुलगी, आज सोशल मीडिया स्टार

मुंबई : सोशल मीडियामुळे आज प्रत्येकाला आपली कला लोकांसमोर दाखवता येते. सोशल मीडियावर कधीही कोणाचंही नशीब चमकू शकतं. जर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे जर तुम्ही दाखवून दिलं तर कित्येक लोक तुम्हाला फॉलो करु लागतात. 

सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे की एखाद्याला इथे प्रसिद्धी मिळू शकते. अल्पावधीतच इथले लोक जगभर प्रसिद्ध होतात. पुन्हा एकदा असंच काहीसं पाहायला मिळत आहे. एका मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

खरंतर संपूर्ण प्रकरण असं आहे की केरळची रहिवासी असलेली किसबू ही रस्त्यावर उभी राहून फुगे विकायची. तिला एका फोटोग्राफरने पाहिलं, त्याचं नाव होतं अर्जुन कृष्णन...

या फोटोग्राफरने तिच्याकडे पाहिले आणि तिचे काही फोटो क्लिक केले. अर्जुनने क्लिक केलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या फोटोमध्ये किसबूचा साधेपणा स्पष्टपणे दिसत होता, त्यामुळेच हा फोटो व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. एका मुलाखतीत अर्जुन कृष्णनने सांगितले की, त्याने किसबूला 17 जानेवारीला अंदलूर कावू महोत्सवात फुगे विकताना पाहिले होते. 

तिचे सौंदर्य आणि साधेपणाने त्याला इतका प्रभावित करुन गेला की त्याने तिचे काही फोटो काढण्याचा विचार केला.

अर्जुन हे देखील सांगितले की त्याने किसबू आणि तिच्या आईला क्लीक केलेले फोटो दाखवले.त्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

किसबूचा फोटो व्हायरल होताच,एका मेकअप आर्टिस्टने तिच्याशी संपर्क साधला आणि किसबूचा पारंपारिक लूक करण्याचं ठरवलं. तिचा मेकओव्हर केला.

आता किसबूच्या मेकओव्हरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती सुंदर आणि पूर्णपणे वेगळी दिसत आहे. या फोटोशूटमध्ये किसबूने पारंपरिक कासवू साडी नेसलेली आहे आणि तिने गोल्डन ज्वेलरी परिधान केली आहे.

 

Read More