Marathi News> मनोरंजन
Advertisement

विरूष्काप्रमाणे सेल्फी क्लिक केल्यानंतर पुनीष आणि बंदगी झाले ट्रोल

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही सध्या लोकप्रिय जोडींपैकी एक आहे.

विरूष्काप्रमाणे सेल्फी क्लिक केल्यानंतर पुनीष आणि बंदगी झाले ट्रोल

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही सध्या लोकप्रिय जोडींपैकी एक आहे.

इटलीमध्ये विरूष्काने मीडिया आणि चाहत्यांपासून लपून लग्न केले. त्यामुळे यंदा विरूष्काचं लग्न अनेक गोष्टींमुळे चर्चेमध्ये आलं आहे.  

विरूष्का मुंबईत  

विराट कोहली आणि अनुष्का लग्नानंतर मुंबईत राहत आहेत. लग्नानंतर लगेजच विराट दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर गेला होता. मात्र एप्रिल महिन्यात आयपीएलचं शेड्युल सुरू होण्यापूर्वी तो काही काही अनुष्कासोबत घालवत आहे.  

मध्यप्रदेशातून परतली अनुष्का 

अनुष्का शर्मादेखील सुई धागा या तिच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मध्यप्रदेशात होती. मात्र विराटसोबत वेळ घालवण्यासाठी व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून अनुष्का मुंबईत परतली आहे. 
अनुष्कानं इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी विराटच्या गालावर किस करतानाचा खास फोटो शेअर केला होता. या फोटोवर सोशलमीडियात खूप चर्चा रंगली. मात्र टेलिव्हिजनवरील एका जोडीनं चक्क या फोटोप्रमाणेच स्वतःचाही फोटो क्लिक केला आहे.  

 

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

पुनीष आणि बंदितचा फोटो  

बिग बॉस 11 च्या पर्वातील जोडी पुनीष शर्मा आणि बंदिता यांनी विराट आणि अनुष्काप्रमाणेच फोटो क्लिक करून सोशल मीडीयात शेअर केला आहे. 

 

 

 

A post shared by Puneesh Sharma (@puneesh4353) on

नेटकर्‍यांनी उडवली खिल्ली   

नेटकर्‍यांनी मात्र पुनीष आणि बंदिताला अशाप्रकारचे फोटो शेअर करण्यापूर्वी लग्न करा असा सल्ला दिला आहे. लग्नानंतर अशाप्रकारचे फोटो टाका असंम्हणत ट्रोल केलं आहे. 

Read More