Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री छवी मित्तल देतेय 'या' भयानक आजाराशी झुंज

अभिनेत्रीचे चाहते आणि मित्र परिवार तिला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत

अभिनेत्री छवी मित्तल देतेय 'या' भयानक आजाराशी झुंज

मुंबई : बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना कॅन्सरसारख्या भयानक आजाराचा सामना करावा लागला आहे. त्यातील काहींनी आपला निरोप घेतला, तर अनेक जण ही लढाई जिंकून आता बरे झाले आहेत.  कॅन्सरचे नाव ऐकताच लोकांना घाम फुटतो. अशा परिस्थितीत अभिनेत्री छवी मित्तलच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. अलीकडेच, छवी मित्तलने तिच्या एका पोस्टमध्ये खुलासा केला आहे की, ती ब्रेस्ट कँन्सरशी झुंज देत आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी ती डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेत आहे.

छवी मित्तलने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'प्रिय स्तन.. ही तुझ्यासाठी कौतुकास्पद पोस्ट आहे. तुझी जादू मी पहिल्यांदा पाहिली जेव्हा तू मला इतका आनंद दिलास. पण तुझं महत्त्व वाढलं जेव्हा तू माझ्या दोन्ही मुलांना फीड दिलस. तुमच्यापैकी एक ब्रेस्ट कँन्सरशी लढत असल्यामुळे आज तुमच्या पाठीशी उभं राहण्याची माझी पाळी आहे. घडणं ही सर्वोत्तम गोष्ट नाही, परंतु यामुळे मला निराश होण्याची गरज नाही.

 'आणि तुमच्यापैकी ज्यांना आधीच माहित आहे त्यांनी, खूप पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही केलेला प्रत्येक कॉल, तुम्ही पाठवलेला संदेश, माझ्यापर्यंत पोहोचत आहे.

या पोस्टनंतर तिचे चाहते आणि मित्र परिवार तिला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनेता करण ग्रोव्हरने हार्ट इमोजीसोबत लिहिलं आहे की, 'देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आवश्यक असलेली शक्ती देवो.

अभिनेत्रीने तिचा पती मोहित हुसैनसोबत  एक डिजिटल प्रोडक्शन कंपनी शिट्टी आईडियास ट्रेंडिंगची स्थापना केली आहे.  तिचे चाहते त्याचबरोबर फॅमेली आणि मित्र परिवार ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

Read More