Marathi News> मनोरंजन
Advertisement

SRS Suicide : सेलिब्रिटी मॅनेजर रेश्मा शेट्टीची पाच तास चौकशी

पोलिसांनी आतापर्यंत ३५ जणांचे जबाब नोंदवले आहे.   

SRS Suicide : सेलिब्रिटी मॅनेजर रेश्मा शेट्टीची पाच तास चौकशी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सध्या त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. परंतु अद्यापही त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येबाबतीत अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता वांद्रे पोलिसांनी सेलिब्रिटी मॅनेजर रेश्मा शेट्टीची पाच तास चौकशी केली आहे. 

रेश्माने सलमान खान, अक्षय कुमार, आलिया भट्ट, कतरिना कैफ यांसारख्या कलाकारांसोबत देखील काम केले आहे. तिने सलमानच्या अनेक चित्रपटांसाठी आणि बिग बॉससाठी  त्याची मदत केली आहे. बॉलिवूडमधल्या प्रतिष्ठित ‘मॅट्रिक्स’ या कंपनीच्या उच्च पदावर ती कार्यरत आहे. 

दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत ३५ जणांचे जबाब नोंदवले आहे. परंतु अद्यापही त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक नव्या चर्चांना उधाण आले आहे. पोलीस देखील याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

त्याचप्रमाणे, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा तुफान रंगला आहे. सर्वत्र वरूण धवन, आलिया भट्ट, सोनम कपूर यांच्यावर टीका होत आहे. शिवाय या ट्रोलींगला कंटाळून काही स्टारकिड्सने आपले ट्विटर अकाऊंट देखील डिलीट केले आहेत. 

Read More