Marathi News> मनोरंजन
Advertisement

या व्यक्तीमुळे Kareena Kapoor आज Saif Ali Khan ची पत्नी नसती

तो दोन मुलांचा बाप...

 या व्यक्तीमुळे Kareena Kapoor आज Saif Ali Khan ची पत्नी नसती

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री करीना कपूर खानने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. त्यामुळे तिचं आज मोठं फॅन फॉलोविंग आहे. बेबोच्या स्टाईलिंगवर देखील चाहते फिदा आहेत. 

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वी करीना कपूरला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना घरात क्वारंटाईन राहावे लागले. क्वारंटाईनमुळे तिला पती सैफ अली खान आणि मुलांपासून दूर राहावे लागले.

पण करीनाला एकदा तिच्या जवळच्या मित्रांनी सैफसोबत लग्न करण्यास मनाई केली होती. सैफ अली खान आणि करीना कपूर खान ही जोडी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक आहे.

दोघांची ही जोडी चाहत्यांना खूप आवडते. ही जोडी अनेकदा चर्चेत असते. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा तिने सैफसोबत लग्नाची बाब तिच्या कुटुंबियांसमोर आणि जवळच्या मित्रांसमोर ठेवली तेव्हा सर्वांनी सैफशी लग्न करण्यास नकार दिला होता.

fallbacks

करिनाच्या जवळच्या मैत्रिणींनी तिला सांगितले की, तिने सैफशी अजिबात लग्न करू नये अन्यथा तिचं करिअर उद्ध्वस्त होईल. त्याचवेळी लोकांनी तिला असेही सांगितले की सैफ 2 मुलांचा बाप आहे, त्यामुळे करिनाने त्याच्याशी लग्न करू नये.

लोकांच्या सांगण्यावरुन करीनाला वाटले की प्रेम करणे जर वाईट गोष्ट असेल तरी ती सैफसोबतच लग्न करणार. सैफसोबत लग्न केल्यानंतर काय होईल हे पाहायचे असल्याचे तिने सांगितले.

सध्या करीना आणि सैफ त्यांच्या प्रेमाने भरलेल्या दुनियेत खूप आनंदी आहेत. दोघांनाही दोन मुले आहेत. ज्यांचे नाव त्यांनी तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान ठेवले.

Read More